झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या तिरंगी टी20 मालिकेत आॅस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंच आणि डॉर्सी शॉर्ट या सलामी जोडीने आंतररराष्ट्रीय टी20 इतिहासात सर्वोच्च भागिदारी करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
या जोडीने आज 3 जुलैला तिरंगी टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना 223 धावांची सलामी भागिदारी रचली.
यात अॅरॉन फिंचने 76 चेंडूत 16 चौकार आणि 10 षटकारांच्या सहाय्याने तब्बल 172 धावा केल्या. तसेच डॉर्सी शॉर्टने 42 चेंडूत 46 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
याबरोबरच टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 200 पेक्षा जास्त धावांची भागिदारीही रचण्याचा मान फिंच आणि शॉर्ट या जोडीने मिळवला आहे.
या जोडीने हा कारनामा करताना सुझी बेट्स आणि सोफी डिवाईन या महिला क्रिकेटपटू जोडीचा टी20 क्रिकेट इतिहासातील 182 धावांच्या सर्वोच्च भागिदारीचा विक्रम मागे टाकला.
याचबरोबर त्यांनी पुरुषांच्या टी20 क्रिकेटमधील मार्टीन गप्टिल आणि केन विलियमसनचा 171 धावांच्या सर्वोच्च भागिदारीचाही विक्रम मोडला आहे.
फिंच आणि शॉर्ट यांच्या या विश्वविक्रमी भागिदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध 20 षटकात 2 बाद 229 धावा केल्या आहेत. तसेच या सामन्यात 100 धावांनी विजय मिळवला आहे.
टॉप 5- पुरुषांच्या टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च भागिदारी:
1. अॅरॉन फिंच आणि डॉर्सी शॉर्ट – 223 धावा
2. मार्टीन गप्टिल आणि केन विलियमसन – 171* धावा
3. ग्रॅमी स्मिथ आणि लुटस् बोस्मन – 170 धावा
4. रोहित शर्मा आणि केएल राहुल – 165 धावा
5. रोहित शर्मा आणि शिखर धवन – 160 धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रचला विश्वविक्रम
–होय, किंग कोहलीला साहेब घाबरले आहेत…
–ब्लाॅग: आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये आशियायी क्रिकेटर्सची उपेक्षाचं?