---Advertisement---

विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने आज करुन दाखवलं

---Advertisement---

आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर अॅरॉन फिंचने आज 3 जुलैला आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम करताना अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

त्याने तिरंगी टी20 मालिकेत यजमान झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना 76 चेंडूत 16 चौकार आणि 10 षटकारांच्या सहाय्याने तब्बल 172 धावा केल्या.

तसेच त्याने या धावा करताना याआधीचा त्याचाच आंतरराष्ट्रीय टी20 मधील  सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मागे टाकला. याआधी त्याने हा विक्रम 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध 156 धावा करुन केला होता.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट इतिहासात दोन वेळा 150 पेक्षा जास्त धावसंख्या गाठणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे अन्य एकाही फलंदाजाला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 150 धावांचा टप्पा एकदाही गाठता आलेला नाही.

फिंचने आज केलेल्या या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 229 धावा केल्या आहे. तसेच त्याने डॉर्सी शॉर्टसोबत 223 धावांची विश्वविक्रमी भागिदारीही केली आहे.

आॅस्ट्रेलियाने या सामन्यात 100 धावांनी विजय मिळवला आहे.

टॉप 5- आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वोच्च धावसंख्या:

172 धावा – अॅरॉन फिंच

156 धावा – अॅरॉन फिंच

145* धावा – ग्लेन मॅक्सवेल

125* धावा – एव्हिन लुईस

124* धावा – शेन वॉटसन

महत्त्वाच्या बातम्या:

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी

पंड्या बंधूंना अंतिम ११मध्ये संधी द्याचं; या माजी खेळाडूची विनंती

सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment