---Advertisement---

व्हिडिओ: सामन्यापूर्वी भारताच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियन कर्णधार; दिल्या 75व्या स्वातंत्र्याच्या हटके शुभेच्छा

On: सोमवार, सप्टेंबर 19, 2022 4:27 PM
aaron finch
---Advertisement---

भारत स्वातंत्र्य होऊन यावर्षी 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून आता भारताला स्वतंत्र्याच्या अमृतवर्षाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. त्यांचा कर्णधार एरॉन फिंच, याचा एक व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओत फिंच दोन्ही देशांमधील संबंधांविषयी बोलत आहे. 

ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील तिनही सामने वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. त्यापैकी पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहलीतमध्ये पार पडेल. त्याआधी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) अधिकृत ट्वीटर खात्यावरून कर्णधार एरॉन फिंच (Aaron Finch) याचा एक खास व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

त्यांनी लिहिले की, “नमस्ते. ऑस्ट्रेलियन संघ याठिकाणी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटचा इतिहास 1947 पासूनच सुरू झाला आहे. तेव्हापासून खूप सारे सामने या दोन संघात खेळले गेले आहेत. मी भारताला स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि 75 वर्षांच्या संंबंधांसाठी शुभेच्छा देतो. भारत, ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील इतर लोकांना हे साजरी करावे.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील असेच लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, “आमचा पुरुष क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. आम्ही भारताला स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षगाठीसाठी शुभेच्छा देतो. आम्हा दोघा देशांमध्ये 75 वर्ष जे द्विपक्षीय संबंध बनले, त्यासाठी थोडा वेळ काढला पाहिले.”

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यानंतर दुसरा सामना 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये खेळला जाईल. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादमध्ये 25 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्वाची ठरेल. देन्ही देशांना या मालिकेत स्वतःच्या संघातील कमतरता समजू शकेल, ज्यावर टी-20 विश्वचषकापूर्वी त्यांना सुधारणा देखील करता येईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘पंत आणि कार्तिक दोघेही…’, भारतीय यष्टीरक्षकांविषयी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
वर्ल्डकप तोंडावर असतानाच बांगलादेशच्या दिग्गजाचा हादरवून टाकणारा निर्णय, जाहीर केली निवृत्ती
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---