---Advertisement---

शेवटच्या विश्वचषकातील फक्त एक कर्णधार वाचवू शकलाय जागा, तिघांनी तर वनडेला अलविदाही केलाय

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 3:25 PM
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंच (Aaron Finch)याने नुकतेच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. फिंचने त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या वनडे सामन्यात 5 धावा केल्या. त्याने निवृत्ती घेतल्याने 2019च्या विश्वचषकातील संघांच्या कर्णधारांमध्ये आणखी एक बदल पाहायला मिळाला आहे.

वनडे विश्वचषक 2019च्या स्पर्धेत 10 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातील नऊ संघांचे कर्णधार बदलले आहेत, तर आता फक्त एकच कर्णधार आहे ज्यावर संघाने विश्वास दाखवला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघ हा एकमेव संघ आहे ज्याच्या कर्णधाराने 2019च्या विश्वचषकात नेतृत्व केले. केन विलियमसन (Kane Williamson) याच्यावर बोर्डने विश्वास दाखवला असून तो आगामी 2023च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत देखील संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची दाट शक्यता आहे.

विलियमसनने न्यूझीलंडला 2019च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. तसेच त्याने 2021च्या टी20 विश्वचषकामध्ये संघाचे नेतृत्व करताना अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. या दोन्ही स्पर्धांमध्ये न्यूझीलंड उपविजेता राहिला. अशावेळी निवडकर्त्यांना त्याच्या नेतृत्वपदावर पूर्णपणे विश्वास आहे.

आयसीसी 2019च्या वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर अनेक संघांच्या कर्णधारपदामध्ये बदल दिसला आहे. याची सुरूवात इंग्लंडपासून करूया. 2019मध्ये संघाला पहिला वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्या ओएन मॉर्गन याने निवृत्ती घेतल्याने संघाचे नेतृत्व जोस बटलर करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व विश्वचषकामध्ये फाफ डु प्लेसिस याने केले होते. आता टेम्बा बावुमा करत आहे. तसेच भारताचे नेतृत्व विराट कोहली याच्यानंतर रोहित शर्मा करत आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे कर्णधारपद सरफराज अहमद याच्याकडे होते. आता त्याची जागा बाबर आझम याने घेतली आहे.

अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व हश्मतुल्लाह शाहिदी करत असून त्याआधी गुलबदीन नईब संघाचा कर्णधार होता. श्रीलंकेसाठी 2019च्या विश्वचषकात दिमुथ करूणारत्ने याने कर्णधारपद सांभाळले होते, तर आता संघाचा कर्णधार दसुन शनाका आहे. बांगलादेशसाठी मश्रफे मोर्तजा याच्याजागी तमीम इकबाल वनडे संघाचे नेतृत्व करत आहे.

वेस्ट इंडिजनेही त्यांचा कर्णधार बदलला आहे. त्यांच्या वनडे संघाचा कर्णधार जेसन होल्डर नाहीतर निकोलस पूरन आहे. तसेच यामधील काही कर्णधार असे आहे ज्यांनी निवृत्ती घेतली आहे. ज्यामध्ये फिंच, मॉर्गन आणि मोर्तजा यांचा समावेश आहे. तर फाफ, नईब आणि अहमद हे सध्या संघाचे भाग नाहीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---