ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलिया संघासाठी रविवार (२५ जुलै) हा दिवस खूपच वाईट ठरला. एकाच दिवशी २ वाईट घटना घडली. पहिली घटना म्हणजे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. तर दुसरी घटना म्हणजे ऑस्ट्रेलिया मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आरोन फिंच हा मोठ्या कालाधीसाठी संघातून बाहेर गेला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आरोन फिंचला गुडघ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे फिंचला वेस्ट इंडिज संघासोबत सुरू असलेली एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर बांगलादेश संघाविरूद्धच्या ५ सामन्यांची टी२० मालिकेतून बाहेर जावे लागणार आहे. या दुखापतीमुळे संघाला खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
आयसीसीची महत्वाची टी२० विश्वचषक स्पर्धा येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे आणि अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार आरोन फिंच आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. टी२० विश्वचषक सामने यूएईमध्ये होणार आहेत. या सामन्यांची तयारी ऑस्ट्रेलिया संघाने सुरू केली आहे. याच दरम्यान फिंचला दुखापत होणे हा संघासाठी खूप मोठा धक्का आहे.
🇦🇺 Australian captain Aaron Finch will miss the remainder of the West Indies series with a knee injury.
He has also been ruled out of Australia's tour of Bangladesh.#WIvAUS pic.twitter.com/nuUX8zzmCY
— ICC (@ICC) July 25, 2021
खरतर वेस्ट इंडीज दौर्यावर टी२० मालिकेदरम्यान आरोन फिंचला गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून फिंच अजूनही बरा झाला नाही. यामुळेच एकदिवसीय मालिकेसाठी यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला संघाचे नेतृत्वपद दिले आहे. कॅरीला फक्त एकाच सामन्याचे नेतृत्व करण्यास सांगितले होते. कारण असे वाटत होते की, दुसर्या सामन्यापर्यंत आरोन फिंच पूर्णपणे बरा होऊन संघात परत येईल. परंतु असे काहीच झाले नाही. त्यामुळे कॅरीला पुढील सामन्यांचेही नेतृत्वपद देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात आतापर्यंत एकूण २ एकदिवसीय सामने झाले असून शेवटचा सामना २६ जुलै रोजी खेळला जाणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला बांगलादेश संघाविरुद्ध ३ ऑगस्टपासून ५ सामन्यांची टी २० मालिका खेळायची आहे. महत्वाचे म्हणजे या संघाचा कर्णधार कोण असेल? हे देखील पाहणे महत्वाचे असेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघासोबत दिग्गज खेळाडू दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती देखील समोर येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तिन्ही वनडेत संधी मिळूनही केल्या फक्त ७४ धावा, भारताच्या ‘या’ फलंदाजांची वनडे कारकिर्द संपुष्टात?
विराटची वाढली चिंता! ‘हा’ प्रमुख खेळाडू होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर