ऑस्ट्रेलिया संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत करत आहे. संघाची कमान ऍरॉन फिंचच्या हाती आहे. दोन सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाच्या संघाने दोन विजयांसह मालिका जिंकली असली तरी संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. अशा परिस्थितीत, वृत्तानुसार, फिंच लवकरच कारकिर्दीत मोठे पाऊल टाकू शकतो आणि ही एकदिवसीय मालिका त्याची शेवटची वनडे मालिका ठरेल.
ऍरॉन फिंच निवृत्तीची घोषणा करू शकतो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिंच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. रविवारी (11 सप्टेंबर) न्यूझीलंडविरुद्ध होणारा तिसरा एकदिवसीय सामना त्याच्या या फॉरमॅटमधील कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल, असे मानले जात आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये फिंच खराब फॉर्मशी झगडत आहे. गेल्या 7 डावात त्याने एकूण 26 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तो तीन वेळा 0 धावांवर बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दोन्ही डाव एकत्र करताना त्याला केवळ 5 धावा करता आल्या आहेत.
ऍरॉन फिंचची क्रिकेट कारकीर्द
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पांढऱ्या चेंडूचा कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणारा ऍरॉन फिंच एक मजबूत खेळाडू म्हणून आपली छाप पाडतो. त्याने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये योगदान दिले आहे. त्याने आयपीएलमध्येही अनेक सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 5 कसोटी, 145 वनडे आणि 92 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 145 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतके आणि 30 अर्धशतकांसह 5401 धावा केल्या आहेत.
याशिवाय त्याने 92 टी-20 सामन्यांमध्ये 2855 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 5 कसोटी सामन्यांमध्ये फिंचने केवळ 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने कसोटी फॉर्मेटमध्ये 278 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळणाऱ्या फिंचने 92 सामन्यांमध्ये 2091 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुलिप ट्रॉफी 2022: यशस्वी जयसवालचे फर्स्ट ‘क्लास’ द्विशतक, कॅप्टन रहाणेही दिसला फॉर्ममध्ये
VIDEO | हे काय? पाकिस्तानी चाहत्यांची कुटाई केली, पण भारतीयांच्या गळ्यात पडून सामना पाहत होते अफगाणी चाहते
Video: अभी है क्रिकेट बाकी! 71वे शतक ठोकल्यानंतर विराट-भुवीचे संभाषण झाले व्हायरल