दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत युवा वेगवान गोलंदाज आवेश खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत हा गोलंदाज आपल्या कामगिरीने छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. आता भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने आवेश खानवर मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक आशिष नेहराचा असा विश्वास आहे की आवेश खानने वाईट गोलंदाजी केली नाही. तो म्हणाला की, भारतीय कर्णधार आवेश खानचा सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वापर केला जात आहे. तसेच त्याला सतत गोलंदाजी करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे या खेळाडूच्या गोलंदाजीत ती धारदारता दिसून येत नाही.
शेवटच्या षटकांत अर्शदीप सिंग उत्तम पर्याय
आशिष नेहरा म्हणाला की, “जर भारताला मधल्या षटकांव्यतिरिक्त डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करू शकेल असा गोलंदाज शोधत असेल तर अर्शदीप सिंगचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे. अर्शदीप सिंग हा एक चांगला पर्याय ठरेल. आवेश खान खेळाच्या कोणत्या टप्प्यात चांगली गोलंदाजी करू शकतो हे सांगणे फार कठीण आहे. आवेश खानला संघ व्यवस्थापनाकडून पुरेसा आत्मविश्वास मिळत नसल्याचेही त्याने सांगितले. भारतीय कर्णधाराने खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आवेश खानचा वापर केला आहे. पण तरीही माझा विश्वास आहे की या खेळाडूने इतकी वाईट गोलंदाजी केलेली नाही.”
भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने सांगितले की, “सुरुवातीच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमारचा चेंडू चांगला स्विंग होत आहे. त्याचबरोबर विकेट घेण्यातही तो यशस्वी आहे. अशा परिस्थितीत भुवनेश्वर कुमारला सुरुवातीलाच ३ षटके दिली पाहिजेत. तो म्हणाला की, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंगसारखे गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी करू शकतात. त्यामुळे भुवनेश्वर कुमारची ३ षटके सुरुवातीलाच झाली पाहिजेत. तसंच चौथ्या टी२०मध्ये आवेश खानच्या जागी अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते, असं आशिष नेहराचं मत आहे. त्याशिवाय इतर बदलांची गरज आहे असे मला वाटत नाही.”
दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना शुक्रवार दिनांक १७ जून रोजी राजकोटयेथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. यासाठी संघ राजकोट येथे पोहचले असून चौथ्या सामन्यासाठी सराव करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चहलला टी२० विश्वचषकासाठी संघात घेऊ नये!’, भारताच्या माजी दिग्गजाने सांगितले कारण
आता विदेशी खेळाडूही ‘या’ भारतीयाच्या तालावर नाचणार, आयसीसीने एलीट पॅनलमध्ये केले रिटेन
टी२० विश्वचषकासाठी हा ‘पठ्ठ्या’ उत्तम पर्याय, भारताच्या माजी विश्वविजेत्या दिग्गजाची प्रतिक्रिया