नेपाळ संघाचा सलामीवीर फलंदाज असिफ शेख (Aasif Sheikh) आपल्या संघासाठी महत्वपूर्ण फलंदाज ठरत आहे. यावर्षी नेपाळला पहिल्यांदाच आशिया चषकात भाग घेण्याची संधी मिळाली. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ आहेत. नेपाळ आणि भारत सोमवारी (4 सप्टेंबर) आमने सामने होते. या सामन्यात असिफने नेपाळ संघाला अप्रतिम सुरुवात मिळवून देत वैयक्तिक अर्धशतक केले.
नेपाळ संघ पहिल्यांदा आशिया चषक खेळत असून सोमवारी हा संघ पहिल्यांदा भारताविरुद्ध वनडे सामना खेळला. असात नेपाळ संघासाठी हा सामना अधिकच महत्वाचा होता. या महत्वपूर्ण सामन्यात असिफ शेख (Aasif Sheikh) याने आपली गुणवत्ता सिद्ध केले. त्याने भारताच्याच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांपुढे चौकारांची रांग लावली. असिफने 97 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. नेपाळच्या डावातील 30व्या षठकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. सिराजने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीच्या हातात असिफ झेलबाद झाला. तत्पूर्वी सलामीवीर कुशल भुर्टेल 25 चेंडूत 38 धावा करून यष्टीरक्षक ईशान किशनच्या हातात झेलबाद झाला होता. (Aasif Sheikh become Nepal’s first cricketer to score a fifty against India )
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
नेपाळ प्लेईंग इलेव्हन- असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी.
महत्वाच्या बातम्या –
पंतच्या फिटनेसबाबत चांगली अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाने शेअर केला नवा व्हिडिओ
ASIA CUP 2023 । भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण! पहिल्या पाच षटकात सोडले तीन महत्वाचे कॅच