दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहे. त्याला त्याच्याकडे असलेल्या चौफेर फलंदाजी करण्याच्या असलेल्या क्षमतेमुळे ‘मिस्टर 360’ असे नावही मिळाले. याच त्याच्या चौफेर फटकेबाजीचे सर्वात मोठे उदाहरण पाहायला मिळाले होते, ते 8 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना. डिविलियर्स शनिवारी (दि. 17 फेब्रुवारी) त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या वनडेतील वेगवान शतकाबद्दल जाणून घेऊया…
आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 18 जानेवारी 2015 रोजी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान (जलद किंवा कमी चेंडूत) शतक करण्याचा कारनामा दक्षिण आफ्रिकेचा तत्कालिन कर्णधार व माजी फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने केला होता.
त्याने जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात 44 चेंडूत 60 मिनिटे फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. जवळपास 1 तासात त्याने दिडशतक केले होते, परंतु याच सामन्यात त्याने शतक पूर्ण करताना केवळ 31 चेंडूचा सामना केला होता. त्याने 2014मध्ये कोरी अँडसरन या खेळाडूने वनडेत 36 चेंडूत केलेल्या जलद शतकाचा विक्रम मोडला होता.
#OnThisDay in 2015, AB de Villiers smashed the fastest ODI hundred off just 31 balls!
He went on to score a 44-ball 149, which featured nine fours and 16 sixes 🙌 pic.twitter.com/IFBVmRcRzP
— ICC (@ICC) January 18, 2020
केले होते केवळ 40 मिनिटांत शतक
डिविलियर्स या सामन्यात नाणेफेकमध्ये पराभूत झाला होता. यामुळे वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम आमला व रिली रुसो या दोघांनीही शतकी खेळी केल्या. 39व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रुसो बाद झाला व मैदानात आला एबी डिविलियर्स.
त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पुढे 59 मिनिटे अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. हाशिम आमलाला 153 धावांवर पोहोचेपर्यंत डिविलियर्स 149 धावा करुन तंबूत परतला होता. त्याने 31 चेंडूत जलद शतकी खेळी करताना केवळ 40 मिनिटे घेतली होती.
या तिन्ही खेळाडूंच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 439 धावा केल्या. पुढे हा सामना तब्बल 148 धावांनी दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.
अधिक वाचा- …आणि एबी डिविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपूर्णच राहिलं!
जलद शतक व अर्धशतक
डिविलियर्सने या सामन्यात वनडेतील सर्वात जलद अर्धशतक (16 चेंडू), वनडेतील जलद शतक (31चेंडू) व वनडेतील जलद शतक (40 मिनिटे) हे आपल्या नावावर केले होते. जलद अर्धशतकी खेळी करताना डिविलियर्सने 1996 मध्ये सनथ जयसुर्याने केलेला 17 चेंडूत अर्धशतकी खेळीचा विक्रमही या सामन्यात मोडला होता. हे अर्धशतक त्याने केवळ 19 मिनिटात केले होते.
याच सामन्यात 16 षटकार मारण्याचा पराक्रम डिविलियर्सने केला होता. हा देखील त्यावेळी वनडे सामन्यातील एखाद्या खेळाडूने केलेला विक्रम होता. पुढे हा विक्रम ओएन माॅर्गन (17 षटकार) या खेळाडूने मोडला.
तिसाव्या षटकानंतर फलंदाजीला येत केला होता कारनामा
तिसाव्या षटकानंतर फलंदाजीला येत शतक करणारा डिविलियर्स हा जगातील एकमेव फलंदाज असून त्याने असा कारनामा या सामन्यात दुसऱ्यांदा केला होता. त्यापूर्वी त्याने 2010 मध्ये भारताविरुद्ध असा कारनामा केला होता. (ab de villiers 31 ball century number cruncher when records went for a toss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि एबी डिविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपूर्णच राहिलं!
मला ‘सर’ म्हणत नका जाऊ! स्वतः जडेजाने केली विनंती