आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शनिवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवत या मोसमातील त्यांचा शेवट सुखद केला आहे. बेंगलोर हा आयपीएल 2019 च्या मोसमातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.
या मोसमात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी संघाला पुढे घेऊन जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. पण त्यांना यात अपयश आले. विराट आणि डिविलियर्स हे बेंगलोर संघाचे मागील 8 वर्षांपासून सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
तसेच प्रत्येक वर्षानुसार त्यांनी मैत्रीही घट्ट होत गेल्याचे चाहत्यांनी अनुभवले आहे. मात्र यावर्षी बेंगलोर संघात मार्कस स्टॉयनिस सामील झाला. त्यामुळे विराट आणि डिविलियर्सच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
याबद्दल बेंगलोर संघाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका मजेशीर मुलाखतीत मिस्टर नॅगने विराटला प्रश्न विचारला. त्यावर विराटने तो आणि डिविलियर्स राम-लखनची जोडी असल्याचे म्हटले आहे.
विराट म्हणाला, ‘एबी आणि मी राम-लखन सारखे आहोत. आम्ही भावांसारखे आहोत. कोणीही आमची मैत्री तोडू शकत नाही. स्टॉयनिस हा खूप चांगला व्यक्ती आहे. पण एबी आणि माझे वेगळे नाते आहे. आम्ही एकमेकांशी वेगळ्याच स्तरावर जोडलेले आहोत. तू ते समजू शकत नाही.’
हा आयपीएल मोसम बेंगलोर संघासाठी जरी चांगला ठरला नसला तरी विराट आणि डिविलियर्सने मात्र वैयक्तिक चांगली कामगिरी केली आहे. विराटने या मोसमात 14 सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 464 धावा केल्या आहेत. तसेच डिविलियर्सने 13 सामन्यात 5 अर्धशतकांसह 442 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–राजस्थान विरुद्ध अर्धशतक करणाऱ्या रिषभ पंतने मोडला सेहवागचा हा मोठा विक्रम
–विराट कोहली, डिविलियर्सने शेवटच्या सामन्याआधी मागितली चाहत्यांची माफी, पहा व्हिडिओ
–…आणि अमित मिश्राची आयपीएलमधील चौथी हॅट्रीक हुकली, पहा व्हिडिओ






