सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना गाठण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण एलिमिनेटरचा सामना झाला. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६ विकेट्सने नमवले. परंतु, सामना गमावूनही बेंगलोरच्या यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सने मोठ्या विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली.
डिविलियर्सने केलेले विक्रम
या सामन्यात डिविलियर्सने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शानदार अर्धशतकी खेळी केली. ४३ चेंडूत ५ चौकरांच्या मदतीने त्याने ५६ धावा केल्या होत्या. ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ४१वी वेळ होती. त्यामुळे तो आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
डिविलियर्सपुर्वी डेविड वॉर्नरने सर्वाधिक ५२वेळा हा पराक्रम केला आहे. तर विराट कोहलीने ४४ वेळा आयपीएलमध्ये ५०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तसेच शिखर धवन (४२ वेळा), रोहित शर्मा (३९ वेळा) आणि सुरेश रैना (३९ वेळा) यांनीही हा पराक्रम केला आहे.
एवढेच नव्हे तर, हैदराबादविरुद्ध ५०पेक्षा जास्त धावा करण्याची ही डिविलियर्सची पाचवी वेळ होती. यासह आयपीएल इतिहासात हैदराबादविरुद्ध पाचवेळा ५०पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्याव्यतिरिक्त अंबाती रायडू, शेन वॉटसन, विराट कोहली आणि एमएस धोनी यांनी हैदराबादविरुद्ध प्रत्येकी ४ वेळा हैदराबादविरुद्ध हा पराक्रम केला होता.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
५२ – डेविड वॉर्नर (४ शतके, ४८ अर्धशतके)
४४ – विराट कोहली (५ शतके, ३९ अर्धशतके)
४२ – शिखर धवन (२ शतके, ४० अर्धशतके)
४१ – एबी डिविलियर्स (३ शतके, ३८ अर्धशतके)
३९ – सुरेश रैना (१ शतक, ३८ अर्धशतके)
३९ – रोहित शर्मा (१ शतक, ३८ अर्धशतके)
बेंगलोर विरुद्ध हैदराबाद सामन्याची आकडेवारी
एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २० षटकात ७ विकेट्स गमावत १३१ धावा केल्या होत्या. बेंगलोरच्या या १३१ धावांमध्ये डिविलियर्सच्या ५६ धावा, ऍरॉन फिंचच्या ३२ धावांचा समावेश होता. तर गोलंदाजी करताना हैदराबादच्या जेसन होल्डरने ३ विकेट्स आणि टी नटराजनने २ विकेट्स घेतल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल हैदरबादने १९.४ षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा केल्या आणि सामना खिशात घातला. केन विलियम्सन ५० धावांसह हैदाराबादच्या विजयाचा नायक ठरला. यात मनिष पांडे आणि जेसन होल्डरने प्रत्येकी २४ धावांचे योगदान दिले. बेंगलोरकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. तर ऍडम झम्पा आणि युझवेंद्र चहलने हैदराबादच्या प्रत्येकी १ फलंदाजाला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई हारली परंतू आपला ऋतुराज जिंकला, पुण्यात येताच झाला मोठा सन्मान
भारतीय क्रिकेटरबरोबर पार्टी करताना दिसली आंद्रे रसेलची पत्नी, हुक्का घेत…
दुर्दैवच म्हणायचं अन् काय! फ्री हीट असनूही फलंदाज झाला बाद, पाहा कसं
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा