---Advertisement---

‘यासाठी टी20 क्रिकेट जबाबदार’, केपटाऊन कसोटी दीड दिवसात संपल्यानंतर डिविलियर्सचे मोठे विधान

On: रविवार, जानेवारी 7, 2024 6:20 PM
AB de Villiers
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील केपटाऊन कसोटी अवघ्या दीड दिवसात निकाली निघाली. पण हा सामना इतक्या लवकर संपल्यामुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त केले गेले. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार एबी डिविलियर्स यानेही प्रतिक्रिया. यावेळी डिविलियर्सने उभय संघांतील ही कसोटी मालिका अवघ्या दोनच सामन्यांची असल्यामुळे नाराजीही व्यक्त केली.

भारतीय संघ मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. तीन टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची ही मालिका होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गुरुवारी (4 जानेवारी) संपली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी कसोटी मालिकेतील प्रत्येकी एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटली. तसे पाहिले, तर उभय संघांतील ही कसोटी मालिका तीन सामन्याची असणे अपेक्ष अपेक्षित आहे. पण व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका मागच्या हंगामाप्रमाणे याही वेळी दोन सामन्यांची खेळली गेली. याआधी 2013-14 आणि 2009-10 हंगामातही भारत -दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका दोन सामन्यांची झाली होती. तर 2015-16 हंगामातील कसोटी मालिका 4 सामन्यांची झाली होती. इतर सर्व हंगामांमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळल्या गेल्या.

याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिविलियर्स म्हणाला, “मालिका तीन सामन्यांची झाली नाही, त्यामुळे मी जास्त आनंदी नाहीये. यासाठी आपण टी-20 क्रिकेटला जबाबदार धरले पाहिजे. जगभरात हेच खेळले जात आहे. यासाठी कुणाला दोष द्यायचा हे मला माहीत नाही, पण मला हे कळते की, काहीतरी चुकिचे होत आहे. जर तुम्ही सर्व संघांना प्रतिस्पर्धा करताना आणि कोण सर्वश्रेष्ठ आहे, हे जाणून घ्यायचे आहे, तर बदल झालाच पाहिजे.”

दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघ आपाला आगामी दौरा न्यूझीलंडला करणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत त्यांना दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी आपला दुसऱ्या दर्जाचा संघ निवडला आहे. कारण हा न्यूझीलंड दौरा आणि दक्षिण आफ्रिकेत खेलली जाणारी एसए20 लीग यांच्या तारखा एकमेकांना क्रॉस करत आहेत. एसए20 लीग 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान खेळली जाणार आहे. याच कारणास्तव न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद अनकॅप्ड खेळाडू नली ब्रांड याच्याकडे सोपवले गेले आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. (AB de Villiers’ Big Statement on the Future of Test Cricket)

महत्वाच्या बातम्या- 
Sydney Test । मॅकग्रा कुटुंबीय हात मिळवण्यासाठी उत्सुक, पण रिझवानचा थेट नकार, व्हिडिओची तुफान चर्चा
रिषभ पंतची बहीण साक्षीची नव्या इनिंगला सुरूवात; बाॅयफ्रेंड अंकित चौधरीसोबत केली एंगेजमेंट, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---