पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने ग्लेन मॅकग्रा यांच्या कुटुंबातील महिलांसोबत हात मिळवणे टाळले. नुकतीच सिडनीमध्ये ‘पिंक टेस्ट’ पार पडली. उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने जिंकला. मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला व्हाईट वॉश (3-0) स्वीकारावा लागला. सिडनी कसोटी संपल्यानंतर मोहम्मद रिझवान मैदानात ज्या पद्धतीने मॅकग्रा कुटुंबाला भेटला, त्याची सध्या चर्चा होत आहे.
ग्लेन मॅकग्रा (Mohammad Rizwan) हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या इथिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक राहिले आहेत. सिडनीमध्ये आयोजित ‘पिंक टेस्ट’ ही मॅकग्रा फाऊंडेशनकडून आयोजित केली जाते. ही संस्था मागच्या काही वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांसाठी काम करत आहे. तसेच संस्थेकडून सिडनी कसोटीदरम्यान गुलाबी संगाचे कपडे घालण्यासाठी प्रत्साहण देखील दिले जाते. 2008 मध्ये मॅकग्रा यांची पत्नी जेन हिचे या आजारामुळे निधन झाले होते. तेव्हापासून स्तनाच्या कर्गरोग असणाऱ्या रुग्णांची सेवा करण्यासाठी मॅकग्रा फाऊंडेशन परिचारिकांना (नर्स) पाठवळ देत आहे.
मंगळवारी (3 जानेवारी) सुरू झालेला सिडनी कसोटी सामना शनिवारी (6 जानेवारी) ऑस्ट्रेलियाने जिंकला. सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान संघ मैदानात उपस्थित मॅकग्रा कुटुंबियांशी हातमिळवणी करत होते. पण यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने मॅकग्रा कुटुंबातील महिलांशी हात मिळवणे टाळले. हात जोडून त्याने महिलांविषयी आदर दाखवला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींच्या मते हा रिझवानने दाखवलेला आदर आहे, तर काहींच्या मते रिझवान जुन्या विचारांचा आणि महिलांना समान वागणूक न देणारा आहे.
All Pakistan players shook hands with female members in Glenn McGrath’s family but Mohammad Rizwan didn’t ???? #AUSvPAK pic.twitter.com/uxxCzcja8v
— Farid Khan (@_FaridKhan) January 6, 2024
मालिकेतील रिझवानचे प्रदर्शन पाहिले, तर त्याने सिडनी कसोटीत 88 आणि 28 धावांची खेळी केली. त्याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने मेलबर्नमध्ये 42 आणि 35 धावांची खेळी केली होती. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रिझवानच्या आधी अनुभवी सरफराज अहमद याला संधी दिली गेली होती. सहफराजला या सामन्यातील पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 4 धावांची खेळी केली होती. या सुमार प्रदर्शनानंतर रिझवानचे संघात पुनरगामन झाले.
उभय संघांतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 360 धावांनी विजय मिळवला होता. मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 79, तर तिसरा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. (Mohammad Rizwan refuses to shake hands with women from Glenn McGrath’s family in Sydney)
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतची बहीण साक्षीची नव्या इनिंगला सुरूवात; बाॅयफ्रेंड अंकित चौधरीसोबत केली एंगेजमेंट, पाहा फोटो
MS Dhoni Viral Video: एमएस धोनीचा ‘हुक्का’ ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल, माहीचा हा अंदाज पाहून चाहते आश्चर्यचकित






