दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिविलियर्स सध्या यूएईमध्ये आहे. आयपीएल २०२१ कोरोनाच्या कारणास्तव अर्ध्यात स्थगित करण्यात आला होता. आता या हंगामतील उर्वरित सामने यूएईत खेळले जात आहेत. डिविलियर्सही त्याची पत्नी आणि मुलांसोबत आयपीएल २०२१ च्या दुसरा टप्पा खेळण्यासाठी यूएईत उपस्थित आहे. जेव्हा जेव्हा आरसीबीचा सामना असेलस तेव्हा अनेकदा डिविलियर्सची पत्नी आणि त्याची मुले मैदानात उपस्थित राहून त्याला प्रोत्साहन देताना दिसले आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एबी डिविलियर्स आणि त्याची पत्नी डॅनियल डिविलियर्स या दोघांचा एक रोमॅंटिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत डिविलियर्स त्याच्या पत्नीसोबत डान्स करताना दिसत आहे. डॅनियल डिविलियर्सने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. डॅनियलने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा आपण ८० वर्षाचे होऊ, तेव्हाही मी तुझ्यासोबत डान्स करण्यासाठी वाट पाहू शकणार नाही.” डॅनियलने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
https://www.instagram.com/p/CUvDlKLDyZM/
व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या चाहत्यांमध्ये भारताच्या एका खेळाडूच्या पत्नीचेही नाव आहे. भारताचा फिरकी गोलंदाज आणि आरसीबी संघातील डिविलियर्सचा सहकारी युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मानेही डॅनियल आणि एबीच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. चहलची पत्नी धनश्री स्वत: एक प्रोफेशन डान्सर आहे. तिने डॅनियलच्या व्हिडिओवर ह्रदयाच्या आकाराची इमोजीसोबत फायरची इमोजी पोस्ट करत लिहिले आहे की, “माय फेवरेट्स.”
डिविलियर्सने आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत १४ सामने खेळले असून यामध्ये ३०२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नाबात ७६ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्याने या चालू हंगामात आतापर्यंत दोन अर्धशतकही केले आहेत. दरम्यान, डिविलियर्स भाग असलेला आरसीबी संघ यावर्षी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे आणि संघाचे प्लेऑफमधील स्थान पक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बिश्नोईने क्लीन बोल्ड करताच धोनीचा चढला पारा, रागात उच्चारला अपशब्द? व्हिडिओ व्हायरल
टी२० विश्वचषक तोंडावर असताना पाकिस्तान संघात ३ मोठे बदल, एक खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर