दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार एबी डिविलियर्स सध्या भारत दौऱ्यावर आहे. आगामी आयपीएल हंगामात तो रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तववी जात आहे. आरसीबीचा माजी खेळाडू यावेळी सपोर्ट स्टाफचा भाग बनू शकतो. डिविलियर्स त्याच्या चौफेर फलंदाजीमुळे मीस्टर 360 म्हणून ओळखला जात असायचा. आता भारताचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव देखील डिविलियर्सप्रमाणे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना दिसतो. अशात डिविलियर्सकडून मिळालेला एक खास सल्ला सूर्यकुमारसाठी फायदेशीर ठरू शकतो.
एबी डिविलियर्स (AB De Villers) दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघासाठी अनेकदा मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. तर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलरसाठी खेळताना त्याने भारतात मोठा चाहतावर्ग देखील बनवला आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या मोठ्या काळापासून भारताचे प्रतिनिधित्व करत आला असून सध्या त्याची तुलना डिविलियर्ससोबत होताना दिसते. याचे कारण देखील तसेच आहे. सूर्यकुमार देखील अगदी डिविलियर्सप्रामानेच मैदानाच्या प्रत्येक दिशेला मोठे शॉट खेळताना दिसला आहे. अनेक जाणाकांनी देखील सूर्यकुमारची ही क्षमता मान्य केली आहे. परंतु, त्याने सूर्यकुमारला फिटनेसवर आणि खेळाडूच्या रूपात स्वतःवर अधिक लक्ष दिले पाहिजे असेही डिविलियर्सला वाटते.
डिविलियर्स एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, “मला वाटते तो त्याच्या कारकिर्दीत चांगल्या उंचीवर आहे आणि त्याच्याकडे पुरेसा अनुभव देखील मिळवला आहे. त्याने एका खेळाडूच्या रूपात काय करू शकतो, हे दाखवायला त्याने सुरुवात केली आहे. त्याने जर पुठचा एक किंवा दोन वर्ष असे प्रदर्शन सुरू ठेवले, तर भारताचा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनेल. त्यामुळे पुढच्या एक-दोन वर्षात त्याला आयपीएलमध्ये पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तो ज्या पद्धतीन खेळत आहे, त्याच्यात खूप सारख्या गोष्टी समान आहेत. मी जे आधी म्हणालो, जर खेळाडूच्या रूपात तो अजून सक्रिय झाला, तर त्याच्यासाठी खूप चांगले असेल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
PAK vs NZ | उपांत्य सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, ‘अशी’ आहे प्लेइंग इलेव्हन
T20 WC Semi-Final: मार्क वूड, डेविड मलान भारताविरुद्ध खेळणारच! खुद्द कॅप्टन बटलरने दिले संकेत