दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने (AB de Villiers) मे 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने जगभरात होणाऱ्या सर्व टी20 लीगमध्ये सहभाग घेतला. मात्र, आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु अद्याप तो एकही सामना खेळण्यासाठी उपलब्ध झालेला नाही. अशात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने डिविलियर्सला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याची मुदत दिली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी सांगितले की, “आम्ही संघातील सर्व क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमीयर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. पण, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक 2020साठी सर्व क्रिकेटपटूंना एक मुदत देण्यात आली आहे. ते सर्वजण 31 मेपर्यंत कुठेही खेळू शकतात, पण 1 जून रोजी सर्वांना संघ निवडीसाठी उपलब्ध रहावे लागणार आहे.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बाउचर यांच्या वतीने लिहीले आहे की, “आयपीएलचा हंगाम खूप मोठा आहे. म्हणून आम्ही सर्व खेळाडूंना यात खेळण्यास सांगितले आहे. पण, जर तुम्ही आयपीएलमध्ये खेळत असाल तर पुढच्या सामन्यांसाठीही उपलब्ध रहा,” असेही पुढे म्हटले आहे.
“आमच्याकडे विश्वचषकापुर्वी काहीच सामने शिल्लक आहेत. 1 जूनपासून श्रीलंका दौरा आहे, त्यामुळे त्या सर्व खेळाडूंना या दौऱ्यासाठी उपलब्ध रहावे लागणार आहे. आम्ही कोणत्या खेळाडूला निवडू अथवा न निवडू पण त्यांनी विश्वचषकाला ध्यानात घेऊन स्वत: उपलब्ध राहायला हवं.” असेही बाउचर पुढे म्हणाले.
डिविलियर्सने नुकत्याच काही दिवसांपुर्वी सांगितले होते की, त्यांला राष्ट्रीय संघात पुनरागमन करायचे आहे. याविषयी बोलताना पुढे तो म्हणाला, “मी बाउचर यांच्याशी बोलत आहे. ग्रॅमी स्मिथ आणि फाफ डू प्लेसिस यांच्याबरोबर मी याबद्दल चर्चा करणार आहे. यासाठी हे सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी पुन्हा माझ्या संघाकडून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे आणि मला आशा आहे हे सर्व सफल होईल.” असेही डिविलियर्स पुढे म्हणाला.
आयसीसी टी20 विश्वचषक 2020ची सुरुवात 18 ऑक्टोबरला होणार आहे. तर, 15 नोव्हेंबर रोजी हे चषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.