सध्या कोरोना व्हायरसमुळे क्रीडा जगतही ठप्प झालेले असताना अनेक खेळाडू इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने समालोचक पॉमी मगन्गवाबरोबर इंस्टाग्राम लाईव्हवरुन गप्पा मारल्या.
या गप्पा दरम्यान आयपीएलमध्ये रॉयल चॅॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणारा डिविलियर्स म्हणाला, आयुष्यभर त्याला आरबीकडून खेळायला आवडेल.
तो म्हणाला, ‘मी ही फ्रँचायझी, तेथील वातावरण आणि चाहत्यांना पसंत करतो. आयसीबीकडून पहिले ३-४ मोसम खेळल्यानंतर मला जाणीव झाली की मला आयुष्यभर या संघाकडून खेळायला आवडेल.’
डिविलियर्स २०११ पासून आरसीबीकडून खेळतो. तसेच डिविलियर्स हा भारतात सर्वाधिक चाहत्यांचे प्रेम मिळणाऱ्या परदेशी खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे अनेक चाहते भारतात आहेत. त्यामुळे आयपीएलदरम्यान त्याला भारतीय चाहत्यांकडून मोठे प्रोत्साहनही मिळते.
डिविलियर्सची भारताचा आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीबरोबरही चांगली मैत्री असून आरसीबी संघाचे हे दोघे प्रमुख चेहेरे आहेत. डिविलियर्सने आरसीबीकडून १२७ सामने खेळताना ४१.७२ च्या सरासरीने २ शतके आणि ३० अर्धशतकांसह ३७५५ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
स्मिथच्या स्फोटक खेळीचा राज त्याचा शूजमध्ये, पुण्यातून झाली होती त्या गोष्टीची सुरुवात
भारतीय सी ग्रेड क्रिकेटपटू करतात पाकिस्तानच्या टाॅप खेळाडूंपेक्षा जास्त कमाई, पहा
शाहरुख खानची ती ‘खास’ भेटवस्तू तब्बल १२ वर्षानंतर शोएब अख्तर केली दान