दक्षिण अफ्रिकेतील मझांसी सुपर लीग लीग या स्पर्धेत चांगलीच धमाल पाहयला मिळणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 12 मोठ्या खेळाडूंनी सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यात दक्षिण अफ्रिकेचा माजी आक्रमक खेळाडू एबी डिविलिर्स देखील खेळणार आहे. तो त्शान स्पार्टन्स (सेंचुरियन) कडून खेळणार आहे. याच वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर डिविलिर्स पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत भाग घेत आहे.
दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार फाफ डू ल्पेसिस, हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, कगिसो रबाडा, इम्रान ताहीर हे खेळाडू वेगवेगळ्या संघाकडून खेळणार आहेत
एमएसएल या स्पर्धेत परदेशातील खेळाडूही खेळणार आहेत. त्यामध्ये इंग्लडचा वन-डे संघाचा कर्णधार इयान मोर्गन, जेसन राॅय आणि डेव्हीड मॅलन या खेळाडूंचा समावेश आहे. विंडिजचा टी-20 तील सर्वात यशस्वी खेळाडू ख्रिस गेलही तसेच अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रॅव्हो हा देखील या स्पर्धेत खेळणार आहे.
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा या स्पर्धेत खेळणार आहे. विविध देशांतील आक्रमक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेणार असल्यामुळे चुरसीचे सामने पाहायला मिळणार आहेत.
“या स्पर्धेला जगभरातील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे जगभरातील 200 पेक्षा अधिक खेळाडूंचे प्रस्ताव आले आहेत.” असे एमएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी थबांग मुरेंनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-