इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगामाची सर्वजण वाट पाहत आहेत. आयपीएलच्या या 17व्या हंगामासाठी मिनी लिलावदेखील पार पडला आहे. या हंगामासाठी जवळपास सर्व खेळाडू जोरदार उत्सुक आहेत. तसेच, आता या आयपीएल हंगामाबद्दल चर्चेला उधाण आले आहे. तसेच, अनेक विक्रमांबद्दलही चर्चा होताना दिसत आहे. मात्र, 17 फेब्रुवारी रोजी 40व्या वयात पदार्पण करणाऱ्या एबी डिविलियर्स यानेदेखील आयपीएलमध्ये असा विक्रम केला होता, ज्या कुठल्याही परदेशी खेळाडूला आजपर्यंत जमला नाही. चला तर डिविलियर्सच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया, कोणता आहे तो विक्रम.
एबी डिविलियर्स एकमेव परदेशी खेळाडू
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने आतापर्यंत 2008 सालच्या पहिल्या आयपीएल हंगामापासून 184 सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत. त्याने खेळलेल्या 14 आयपीएल हंगामात प्रत्येकी किमान एकतरी सामना खेळला आहे. त्यामुळे आतापर्यंत आयपीएलच्या सर्व 14 हंगामात किमान एकतरी सामना खेळणारा एबी डिविलियर्स एकमेव परदेशी खेळाडू आहे. त्याच्याव्यतिरिक्त आतापर्यंत कोणत्याच परदेशी खेळाडूला आयपीएलच्या सर्व 14 हंगामात खेळता आलेले नाही.
तसेच, आत्तापर्यंत आयपीएलच्या सर्व 14 हंगामात किमान एकतरी सामना खेळणाऱ्या एकूण खेळाडूंचा विचार करायचा झाल्यास यात 11 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, पियुष चावला, अमित मिश्रा, रॉबिन उथप्पा, मनिष पांडे, शिखर धवन, वृद्धिमान साहा आणि धवल कुलकर्णी या भारतीय खेळाडूंनी सर्व 13 आयपीएल हंगामात किमान एकतरी सामना खेळला आहे.
एबी डिविलियर्सची आयपीएलमधील कामगिरी
एबी डिविलियर्स आतापर्यंत खेळलेल्या 184 आयपीएल सामन्यांत 39.70 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतके आणि 40 अर्धशतके केली आहेत. एबी डिविलियर्सने आयपीएल 11 ऑक्टोबर, 2021मध्ये रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अखेरचा आयपीएल सामना खेळला होता. त्याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत दिल्ली डेअरडेविल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. एकूण 11 हंगामात तो बेंगलोर संघाचा प्रमुख भाग राहिला होता. (ab de villiers is the only overseas player to play at least one match in every ipl edition)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच
केवळ ४० मिनिटांत झाले होते एबी डिविलियर्सचे वनडेमधील शतक; मोडले होते ‘हे’ विश्वविक्रम