---Advertisement---

एबी डिविलिअर्सला ‘या’ फलंदाजामध्ये दिसते स्वतःचीच झलक

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 12:58 PM
---Advertisement---

एबी डिविलिअर्स सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जाते. क्रिकेट माहित असलेल्यांपैकी क्वचितच एखादा असेल ज्याला डिविलिअर्सची फलंदाजी माहित नसेल. डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकेला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. तर क्रिकेट विश्वात अनेक विक्रमही त्याने आपल्या नावे केले आहेत.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना डिविलियर्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०११ पासून तो या फ्रेंचायझीबरोबर खेळत आहे.

डिविलियर्सने आयपीएल २०२० बद्दल बोलताना एका अशा फलंदाजाचे नाव घेतले ज्याच्यात त्याला स्वत:ची छबी दिसत आहे. तो ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जोस फिलिपमध्ये तो स्वत: ला पाहतो. आरसीबीच्या अधिकृत अ‍ॅपवर व्हिडिओमध्ये बोलताना तो म्हणाला की, युवा खेळाडूंनी सजलेल्या आरसीबीसाठी आपले आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्याची उत्सुकता आहे.

तो म्हणाला, ‘आयपीएलच्या या हंगामात आमच्याकडे जगातील काही सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आमच्या संघात अ‍ॅरोन फिंच, मोईन अली, अ‍ॅडम झम्पा आणि जोस फिलिप आहेत. मला जोसबरोबर एकत्र मिळून काम करायचे आहे. मी माझ्या तारुण्यात ज्याप्रकारे खेळत होतो , जोस त्याचप्रमाणे खेळतोय. आमच्या दोघांमध्ये काही समानता मी पाहत आहे.’

आयपीएल बद्दल बोलताना तो म्हणाला, ‘राहिलेले ४ खेळाडू लवकरच संघाबरोबर जोडले जातील. मी जोशबद्दल खूपच उत्साहित आहे, मी त्याला सिडनी सिक्सर्ससाठी खेळताना पाहिलं आहे. तो नवीन चेंडूवर जोरदार प्रहार करतो. तो खूपच प्रतिभावान खेळाडू आहे. मी ऐकलं आहे की एडम गिलख्रिस्टनेही त्याच्याबद्दल चांगलं भाष्य केले होते.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---