२७ फेब्रुवारी २०१५ रोजी क्रिकेट विश्वचषकातील ब गटाच्या सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने २ षटकांत चक्क ६४ धावा दिल्या होत्या. त्याला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डी विलीयर्सच्या स्फोटक फलंदाजीला सामोरे जावे लागले होते.
एबी डी विलीयर्सने या सामन्यात ६६चेंडूत नाबाद १६२ धावा केल्या होत्या. त्याने ५२ चेंडूत शतकी तर ६४ चेंडूत १५० धावा केल्या होत्या.
विंडीजचा त्या वेळी कर्णधार असलेल्या जेसन होल्डरने १० षटकांत १०४ धावा दिल्या होत्या. त्यात पहिल्या ८ षटकांत ४० धावा दिल्या होत्या, परंतु पुढच्या दोन षटकांत त्याने ६४ धावा दिल्या.
विंडीजच्या ४८व्या षटकात त्याने ४, नो-बाॅल ६, २, नो-बाॅल ४, ४, ४, २, ६ अशा एकूण ३४ तर ५०व्या षटकात २, ६, ६, ४, ६, ६ अशा एकूण ३० धावा दिल्या होत्या.
याच जोरावर दक्षिण आफ्रिकेने ५ बाद ४०८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्त्युतर देताना विंडीजचा डाव १५१ धावांत संपुष्टात आला.
#OnThisDay in 2015, @ABdeVilliers17 didn't just smash a stunning 162* against West Indies – he only took 66 balls doing it! The fastest 150 ever in ODIs! 💥 pic.twitter.com/EYW8AnoOXj
— ICC (@ICC) February 27, 2018