fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, आम्हीच जिंकणार आयपीएल; पहा कोण म्हणतंय

September 18, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings


मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात तीन वेळा पोहचूनही विजेतेपद पटकावू शकला नाही. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या संघाला अद्याप निराशा हाती लागली आहे. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारखे धुरंधर खेळाडू आरसीबीला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेताहेत. यासाठी वाटेल ती भूमिका बजावण्यासाठी ते तयार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) फलंदाज एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी आपण फलंदाजीसह गोलंदाजी करण्यासही तयार आहे. गरज भासल्यास संघासाठी गोलंदाजी करण्यासही तयार असल्याचे त्याने संघाचा कर्णधार विराट कोहलीला सांगितले आहे.

तो म्हणाला की, ‘या हंगामात आमच्याकडे जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही संघाला पराभूत करण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. आमच्याकडे अ‍ॅरोन फिंच, मोईन अली, अ‍ॅडम जंपा, जोशुआ फिलिपसारखे खेळाडू आहेत.’

मला गोलंदाजीचा आनंद आहे: डिव्हिलियर्स

“मी विराटबरोबर नेहमी विनोद करतो. दोन दिवसांपूर्वी मी त्याला सांगितले होते की, जर मला संघाच्या हितासाठी गोलंदाजी करायची असेल तर मी त्यासाठी उपलब्ध आहे. पाहा, मी कधीच चांगला गोलंदाज झालो नाही, पण मला गोलंदाजी करण्याचा आनंद आहे. मी पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करण्यास सज्ज आहे,” असेही डिव्हिलियर्सने सांगितले.

डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळी घेतले आहेत

डिव्हिलियर्स हा उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. त्याने कसोटी सामन्यात 2 तर वनडे सामन्यात 7 बळी घेतले आहेत. अलीकडे संघाचा कर्णधार कोहली म्हणाला की, ‘2016 नंतर आरसीबीकडे सर्वात संतुलित संघ आहे.’ अशा परिस्थितीत डिव्हिलियर्सबरोबर गोलंदाजी करण्याची गरज भासणार नाही.

‘फिलिप माझ्यासारखाच खेळतो’

डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जोशुआ फिलिपचे कौतुक केले आणि सांगितले की, “फिलिपने या उन्हाळी हंगामात चांगली कामगिरी केली आहे. फिलिपला पाहून बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या.  तो माझ्यासारखाच खेळतो. फिलिप आणि माझ्यात बरेच साम्य आहे.”

फिलिपला बंगळुरूने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले

फिलिपला आरसीबीने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर विकत घेतले. फिलिपने आतापर्यंत 32 टी -20 सामने खेळले आहेत आणि 33 च्या सरासरीने 798 धावा केल्या आहेत.  यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, फिलिप गेल्या हंगामात बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. त्याने 16 सामन्यात 487 धावा केल्या.

3 वेळा फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही आरसीबी अजिंक्यपद जिंकू शकली नाही

कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) 21 सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. आरसीबीने आयपीएलच्या 12 हंगामांपैकी तीन वेळा (2009, 2011 आणि 2016) अंतिम सामने खेळले आहेत. पण प्रत्येकवेळी त्यांना अपयश आले आहे.


Previous Post

तुम्हाला माहिती आहेत का आयपीएलमधील नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post

यूएईमध्ये धोनीला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार; जडेजाचाही झाला सन्मान

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

यूएईमध्ये धोनीला मिळाला 'हा' मोठा पुरस्कार; जडेजाचाही झाला सन्मान

Photo Courtesy: Twitter/SunRisers

क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणते 'या' खेळाडूच्या फिटनेसवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही

Photo Courtesy: Facebook/RajasthanRoyals

आयपीएल इतिहासातील एकमेव भारतीय गोलंदाज, ज्याने केलाय २ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.