क्रिकेटमधील सर्वात मोठी क्रिकेट टी२० लीग म्हणजे आयपीएल (IPL 2022). यावर्षी आयपीएल मार्च महिन्याच्या शेवटी आयोजित केली जाणार आहे. त्यापुर्वी आयपीएलचा मेगा लिलाव (IPL mega auction 2022) १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या लिलावासाठी एकूण ५९० खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. यापुर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाच्या पाॅडकास्टमध्ये संघाचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB De villiers) म्हणाला की, कोणत्याही युवा खेळाडूसाठी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवणे किती कठीण आहे, हे सांगणेही सोपे नाही. १.२५ अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाच्या राष्ट्रीय संघात खेळणे सोपे नाही.
तो म्हणाला की, “जर त्याचा जन्म भारतात झाला असता तर तो कदाचित राष्ट्रीय संघात खेळू शकला नसता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न अपुर्णच राहिले आसते. भारतीय खेळाडूंचा खुप आदर केला पाहिजे, कारण भारतीय संघात स्थान मिळवणे सोपे नाही.”
पुढे एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “मी मागील १५ वर्षांपासून आयपीएल, क्रिकेट, भारतीय प्रेक्षक आणि भारतीय लोकांची काम करण्याची पद्धत अनुभवली आहे. हे माझे नशीब आहे. भारतात जन्म घेणे ही एक मोठी बाब आहे. माझा जन्म भारतात झाला असता तर कदाचित मला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नसती. भारतीय संघात स्थान मिळवणे हे खूप कठीण आहे. यासाठी तुम्हाला विशेष खेळाडू बनावे लागते.”
एबी डिव्हिलियर्स २००८ मध्ये, जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली तेव्हापासून खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याने आत्तापर्यंत १८४ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत डेव्हिड वाॅर्नरनंतर सर्वाधिक धावा करणारा हा दुसरा परदेशी खेळाडू आहे.
एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेत जेवढा लोकप्रिय नाही तेवढा तो भारतात लोकप्रिय आहे. एबी डिव्हिलियर्स आयपीएल संघ आरसीबीकडून खुप वर्षे खेळला आहे आणि यामुळेच त्याला भारतातून मोठा चाहतावर्ग लाभला आहे. जगभरातील इतर देशांच्या मानाने डिव्हिलियर्सला भारतात खूप प्रेम आणि आदर मिळाले. यावर्षी त्याला आरसीबीने संघात रिटेन केलेले नाही. सर्वाधिक कमाईच्या बाबतीत डिव्हिलियर्स पहिल्या ५ मधील एकटाच विदेशी खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेतून आत्तापर्यंत ५१ कोटी, ५२ लाख, ६५ हजार रुपये कमवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“साहा, तू बेस्टच आहेस, पण संघातील राजकारणाला बळी पडलास”, माजी क्रिकेटरची आगपाखड
नारळ देण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी! रहाणेसह ‘या’ ४ खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध खेळवणार नाही बीसीसीआय
भारताच्या ताफ्यात निवड होऊनही कुलदीप बाकावरच, संघ व्यवस्थापनाच्या वागणुकीवर प्रशिक्षक म्हणाले…