---Advertisement---

भारताच्या ताफ्यात निवड होऊनही कुलदीप बाकावरच, संघ व्यवस्थापनाच्या वागणुकीवर प्रशिक्षक म्हणाले…

On: गुरूवार, फेब्रुवारी 10, 2022 5:49 PM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

सध्या भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यात मायदेशात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले आहेत आणि दोन्हीमध्ये भारताने विजय मिळवला. भारतीय संघ मालिकेत २-० अशा आघाडीवर आहे. भारतीय संघाचा युवा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (kuldeep yadav) याला एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेले आहे, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला अद्याप संधी दिली गेली नाहीय.

कुलदीप यादवल संघात स्थान देण्याविषयी कर्णधार रोहित शर्मानेही यापूर्वी महत्वाची प्रतिक्रिया दिली होती. रोहितने सांगितल्याप्रमाणे कुलदीपला फॉर्ममध्ये परतण्यासाठी काही सामने खेळावे लागतील. यापूर्वी त्याने श्रीलंका दौऱ्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेत कुलदीप आणि युजवेंद्र चहलची जोडी पुन्हा एकदा अप्रतिम प्रदर्शन करून दाखवेल अशी अपेक्षा होती, पंरतु कुलदीपच्या जागी अष्टपैलू वाशिंगटन सुंदरला संधी दिली गेली. सुंदरने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात अप्रतिम प्रदर्शन करत मिळालेल्या संधीचे सोने केले.

संघ व्यवस्थापन कुलदीपविषयी एका रणनितीवर चालताना दिसत आहे. कर्णधार रोहितही त्याला अजून थोडा वेळ देऊ इच्छित आहे. त्याला संधी देण्यासाठी रोहित कसल्याही प्रकारची घाई करताना दिसत नाहीय. कुलदीप यादवचे प्रशिक्षक कपिल पांड्ये यांनी संघाच्या या रणनितीसंदर्भात महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. कपिल म्हणाले की, “देशासाठी खेळणे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि कुलदीप यादवला त्याच्या संधीसाठी संयम ठेवावा लागेल.”

दरम्यान, कुलदीप श्रीलंका दौऱ्यात त्याचा शेवटचा सामना खेळला होता. त्यापूर्वी त्याने आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील काही सामनेही खेळले होते. त्यानंतर त्याने दुखापतीवर शस्त्रक्रिया केली आणि काळी काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घालवला. सध्या तो फिट झाला आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची वाट पाहत आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत १७४ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

मेहनतीला मिळाली कौतुकाची थाप, प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर हिटमॅन म्हणतो ‘मी मायदेशात अशी गोलंदाजी..’

WWE सुपरस्टार ‘द ग्रेट खली’ भाजपाच्या झेंड्याखाली, दिल्लीत स्विकारले BJPचे सदस्यत्व

देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के! अंडर-१९ WC नंतर यश धूलसाठी आणखी एक आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---