---Advertisement---

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?

On: रविवार, मे 27, 2018 12:09 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली होती.

डिव्हिलियर्सचा एक मोठा चाहता वर्ग भारतात आहे. त्याचमुळे की काय त्याच्या नावाने कुणीतरी शेगांवच्या गजानन महाराज संस्थानात देणगी दिल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरलं होत आहे.

त्याने बुधवारी क्रिकेटमधून संन्यास घेतला असून कुणीतरी ही देणगी गुरुवार दिनांक २४ मे रोजी दिल्याची तारीख त्यावर आहे.

इंग्रजी भाषेत हे नाव टाकल असुन त्यात त्याचा पत्ता दक्षिण आफ्रिका असा लिहीला आहे. ही देणगी नक्की कुणी दिली याबद्दल मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेडून ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत.

या खेळाडूला वनडेत १०,००० धावा करण्यासाठी केवळ ४२३ धावांची गरज होती. त्याने २२८ वनडेत २५ शतके आणि ५३ अर्धशतके केली आहेत. भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेळाडू म्हणुन एबीकडे पाहिले जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल!

-Breaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो!

१८ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम

राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही!

मोठा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment