लंडन। गुरुवार, 24 मे पासुन इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेला सुरवात झाली आहे. पण लॉर्डसवर चालू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
त्यांचा फलंदाज बाबर आझमच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. शुक्रवारी, पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना आझमच्या डाव्या हाताला बेन स्टोक्स गोलंदाजी करत असतानाचा एक चेंडू लागला. त्यामुळे, त्याच्या हातला फ्रॅक्चर झाले.
ज्यावेळी अाझमला ही दुखापत झाली त्यावेळी तो 120 चेंडूत 68 धावांवर खेळत होता. तसेच त्याने पाकिस्तानच्या डावात सर्वाधिक धावा केल्या होत्या.
त्याच्या या दुखापतीबद्दल पाकिस्तानचे फिसिओथेरपिस्ट म्हणाले, “शेवटच्या सत्रात आम्ही त्याला मैदानाबाहेर घेऊन गेलो. कारण त्याला बॅटची ग्रीपही नीट धरता येत नव्हती. आम्ही त्याच्यावर उपचार केले.”
“दुर्दैवाने, एक्सरेमधून फ्रक्चर असल्याचे निश्चित झाले. मनगटाच्यावरती हे फ्रक्चर झाले आहे. त्यामुळेच त्याला त्याची बॅट नीट पकडता येत नव्हती. साधारणत: अशा फ्रॅक्चरमधून बर होण्यासाठी 4 ते 6 आठवडे लागतात.”
Babar Azam injury update by Pakistan Team Physiotherapist, Cliffe Deacon pic.twitter.com/OTRVNMAxf8
— PCB Media (@TheRealPCBMedia) May 25, 2018
आझमचा बदली खेळाडू म्हणून उस्मान सलाहुद्दीन, फखर झामन किंवा समी अस्लम यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते. या फलंदाजांना पहिल्या कसोटासाठी 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते. परंतू आझम दुखापत ग्रस्त झाल्याने यांच्यातील एकाला संधी मिळू शकते.
पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर पाकिस्तान पहिल्या डावात 8 बाद 350 धावांवर खेळत असून त्यांनी 166 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंड पहिल्या डावात 184 धावांवर सर्वबाद झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये?
–जे आयपीएल २०१७मध्ये झालं तेच २०१८मध्ये होणार का?
–बापरे! कालच्या सामन्यानंतर एवढं कौतुक आलं राशीदच्या वाट्याला
–अखेर आयपीएलला मिळाला दुसरा सुपरमॅन, केला असा काही कारनामा की ऐकतच रहाल!
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज