कोलकाता। शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2018च्या क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैद्राबादने कोलकाता नाईट रायडर्सवर 14 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.
त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हैद्राबाद आणि चेन्नई हे दोन संघ यावर्षीच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या दोन स्थानावर होते. त्यामुळे आता या दोन अव्वल संघांमध्ये आयपीएल 2018 चा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे.
साखळी फेरीनंतर गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये अंतिम सामना होण्याची ही आयपीएल इतिहासातील सहावी वेळ आहे.
गेल्यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा संघ साखळी सामन्यात पुण्याविरुद्ध दोन्ही सामने पराभूत झाला होता. त्यानंतर प्ले-आॅफमध्येही पुण्याने मुंबईला पराभूत केले होते. परंतू फायनलमध्ये मात्र मुंबईने याचा वचपा काढत आयपीएल २०१७वर आपले नाव कोरले.
यावेळीही आयपीएलमध्ये साखळी फेरीत चेन्नईने दोन्ही सामन्यात हैद्राबादला पराभूत केले आहे. शिवाय प्ले-आॅफच्या लढतीततही हैद्राबाद चेन्नईविरुद्ध पराभूत झाले आहे. त्यामुळे आता जर अंतिम सामन्यात हैद्राबादने चेन्नईला पराभूत केले तर २०१७ची पुनरावृत्ती होणार आहे.
विशेष म्हणजे २०१७ला मुंबई साखळी फेरीनंतर अव्वल स्थानी होती तर २०१८मध्ये हैद्राबाद अव्वल स्थानी आहे.
हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सामना रविवारी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! कालच्या सामन्यानंतर एवढं कौतुक आलं राशीदच्या वाट्याला
–अखेर आयपीएलला मिळाला दुसरा सुपरमॅन, केला असा काही कारनामा की ऐकतच रहाल!
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज






