भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed Shami) सध्या 2026 च्या दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये ईस्ट झोनकडून खेळत आहे. त्याआधी सेंट्रल झोनविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये शमीने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
टीम इंडियामध्ये (Team india) त्याच्या पुनरागमनाबाबत सतत चर्चा होत आहे. फायनलपूर्वी ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशननेही शमीच्या पुनरागमनाबाबत भाष्य केले होते. आता टीम इंडियाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun on mohmmed shami) यांनी शमीवर मोठे वक्तव्य केले आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना भरत अरुण म्हणाले, “त्याला गोलंदाजी करायला आवडते. तो नेट्समध्ये आहे की सामन्यादरम्यान, याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही त्याला लाल रंगाचा किंवा कोणताही चेंडू द्या, तो आपली रन-अप खूण निश्चित करेल आणि गोलंदाजी सुरू करेल. शमीने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या स्वरूपात खेळला होता.
ते पुढे म्हणाले, कधीकधी तो नेट्सवर यायचा आणि म्हणायचा, ‘मला आज गोलंदाजी करायची नाही.’ पण काही मिनिटांनंतरच तो चेंडू उचलायचा आणि गोलंदाजी सुरू करायचा. त्यानंतर जोपर्यंत तो सव्वा ते एक तास गोलंदाजी करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. शमीला हीच गोष्ट खास बनवते. त्याला कुठेही असला तरी गोलंदाजी करायला खूप आवडते.
भारताने शमीसाठी खूप लवकर दरवाजे बंद केले का? यावर अरुण म्हणाले, “त्यांनी शमीसाठी दरवाजे बंद करायला नको होते. त्याच्यामध्ये अजून खूप क्रिकेट बाकी आहे. जेव्हा एखादा खेळाडू कामगिरी करतो, तेव्हा वयाचा काहीही फरक पडायला नको. तुम्ही त्याची ताकद आणि टॅलेंट पाहता. हे पाहता ही एक शानदार आकडेवारी आहे. विशेषतः लाल चेंडूसह 100 प्रथम श्रेणी सामने खेळणे, जे त्याला सर्वात जास्त आवडते, हे शमीसाठी खरोखरच उत्तम आहे.






