---Advertisement---

2 षटकार अन् चौकार ठोकून गिलची दादागिरी, पण अभिषेकने पुढच्याच चेंडूवर हिसाब चुकता केला; VIDEO

On: मंगळवार, सप्टेंबर 8, 2026 7:48 AM
---Advertisement---

शेर-ए-पंजाब टी-20 लीगचा प्रत्येक सामना रोमांचक ठरत आहे, स्पर्धेतील 17वा सामनाही त्याला अपवाद नव्हता. फाजिल्का फाल्कन्स आणि अमृतसर सुरमा यांच्यातील या लढतीत भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुबमन गिल तसेच आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा हे मुख्य आकर्षण ठरले.

अमृतसर सुरमाविरुद्ध डावाची सुरुवात करताना शुबमन गिलने आक्रमक फलंदाजी केली. गिलच्या या आक्रमकतेसमोर अमृतसरच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. याच दरम्यान, अभिषेक शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

डावाच्या 10व्या षटकात अभिषेकचा सामना करताना गिलने पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला; या थोड्याशा अवधीतच त्याने तब्बल 16 धावा वसूल केल्या.

अभिषेकविरुद्ध पहिल्या तीन चेंडूंवर 16 धावा काढल्यानंतर गिल हे षटक अधिक फलदायी करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाउंड्रीजवळ झेलबाद झाला.अशा प्रकारे, पहिल्या तीन चेंडूंवर मार खाल्ल्यानंतर अभिषेकने षटक संपण्यापूर्वी गिलची विकेट घेत आपली परतफेड केली. गिलने 35 चेंडूंत 67 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

प्रथम फलंदाजी करताना, फाजिल्का फाल्कन्सने गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 191 धावा केल्या. गिलव्यतिरिक्त प्रांशू प्रताप आणि संवीर सिंग यांनी प्रत्येकी 40 धावांचे योगदान दिले. अमृतसरकडून आकाश पांडे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर नमन धीर आणि साहिल खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमृतसर सुरमाने 19.3 षटकांत 6 बाद 195 धावा करत 4 गडी राखून सामना जिंकला. अभिषेक शर्माने अवघ्या 15 चेंडूंत 49 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. राहुल कुमारने 35 चेंडूंत नाबाद 53 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---