दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिविलियर्स सध्या भारतात आहे. इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023च्या आधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला भेटायला आला होता. यादरम्यान त्याचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत तो मुंबईच्या रस्त्यावरील एका चहाच्या टपरीवर चहा पिताना दिसत आहे. एवढा मोठा स्टार क्रिकेटपटू असूनही डिविलियर्सचा हा अंदाज भारतीय चाहत्यांना भलताच आवडला आहे. डिविलियर्सला चाहते मातीशी नाळ जोडलेला म्हणत त्याची प्रशंसा करत आहेत.
मुंबईच्या टपरीवर चहाचा घोट घेताना दिसला एबी डिविलियर्स
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहून चाहते खुश होत आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, “एका व्यक्तीचा साधेपणा. मिस्टर 360 मुंबईत चहाचा आनंद घेताना. खरंच कमालीचा मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती आहे.”
The Man Of Simplicity,Mr 360 Enjoying His Tea At Mumbai Sides.
An Absolute Humble And Down To Earth Character. ♥️@ABdeVilliers17 @RCBTweets pic.twitter.com/UxIAIDEKzN— 𝗦𝗔𝗜𝗞𝗜𝗥𝗔𝗡 (@SaikiranObali) November 10, 2022
AB De Villiers enjoying tea at a local shop in Maharashtra.
An absolute humble and down to earth character. ♥️ pic.twitter.com/hfVW6ZnjSH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 9, 2022
खरं तर, काही दिवसांपूर्वी एबी डिविलियर्सचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. यामध्ये तो बॉलिवूड स्टार रणवीर सिंग याच्यासोबत दिसला होता. रणवीरने डिविलियर्सला भेटल्यानंतर आनंद व्यक्त केला होता. तसेच, त्याला महान खेळाडू म्हटले होते.
डिविलियर्सची भविष्यवाणी चुकली
भारतात पोहोचलेल्या डिविलियर्सने माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा किताब भारताच्या नावावर होईल. त्याने असेही म्हटले होते की, भारताचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. मात्र, त्याच्या या दोन्ही भविष्यवाणी चुकीच्या ठरल्या. कारण, उपांत्य सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघांना पराभवाचा सामना करावा लागला.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला इंग्लंडने 10 विकेट्सने पराभूत केले. तसेच, पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले. अशात रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तान संघात मेलबर्न येथे टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. (AB De Villiers sips tea at a tea stall in mumbai see picture)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
असा राहिलाय इंग्लंड-पाकिस्तानचा ‘रोड टू फायनल’; अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?
जरा इकडे पाहा! इंग्लंडचा गोलंदाज झालाय फिट, पाकिस्तानला करणार सळो की पळो? व्हिडिओ व्हायरल