दक्षिण आफ्रिका व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) चा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला विश्वचषक 2023 साठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आशिया चषक आणि विश्वचषकादरम्यान विराट कोहलीने कोणत्या स्थानावर फलंदाजी करावी हे डिव्हिलियर्सने सांगितले. त्याच्या मते, विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे कारण तो त्या स्थानावर सर्व प्रकारच्या भूमिका बजावू शकतो.
आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी भारतीय संघासमोर चौथ्या क्रमांकाची समस्या कायम आहे. या क्रमांकावर कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांच्याच मनात घोळतोय 2019 च्या विश्वचषकापूर्वीही भारतीय संघाला हीच समस्या होती. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या त्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांचा संघात समावेश असून, ते पुनरागमन करत आहेत.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना एबी याने म्हटले,
“विराट कोहली चौथ्या क्रमांकासाठी योग्य असल्याचे दिसते. या क्रमांकावर खेळताना तो डावाचे नेतृत्व करू शकतो आणि मधल्या फळीत कोणतीही भूमिका बजावू शकतो. विराट या स्थानावर खेळेल की नाही हे मला माहीत नाही. मात्र, संघाला तुमच्याकडून काही हवे असेल तर तुम्ही पुढे येऊन ती जबाबदारी स्वीकारायला हवी.”
विराट कोहली सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आलेला आहे. त्याचा हा क्रमांक जवळपास निश्चित असतो. विराटने यापूर्वी 2011 वनडे विश्वचषकात भारतीय संघासाठी नियमित चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली. सध्या चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी भारताकडे श्रेयस अय्यर, केएल राहुल, तिलक वर्मा व ईशन किशन असे सक्षम पर्याय उपलब्ध आहेत.
(AB De Villiers Suggest Virat Will Play At Number 4 In ODI)
हेही वाचा-
ना विराट, ना गिल! World Cup 2023मध्ये ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार सर्वाधिक धावा, सेहवागची भविष्यवाणी
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! भारताच्या ‘या’ खेळाडूचे करिअर बर्बाद? 2 वर्षांपासून खेळला नाही सामना