भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोघेही अंडर-19 संघात सोबत खेळत होते. शॉच्या नेतृत्वाखाली शुभमन आणि तिलक वर्मा हे अंडर-19 च्या विश्वचषकाचा महत्वाचा भाग होते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन शॉच्या खूप पुढे गेला आहे. त्याने भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारात आपले स्थान पक्के केले आहे. परंतु शॉ गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर आहे. शॉचे खराब प्रदर्शन आणि त्याचा फिटनेस हे यामागच कारण आहे असे म्हणले जात आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) एका खासगी सेल्फीच्या वादातही अडकला होता. एकंदरीत गेली एक-दोन वर्षे त्याच्यासाठी चांगली गेली नाहीत. नुकत्याच झालेल्या इंग्लंडच्या देशांतर्गत स्पर्धेत पृथ्वीने चमकदार कामगिरी केली होती. परंतु, तो दुखापतग्रस्त झाला आणि चांगल्या फॉर्ममध्ये असूनही त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अशा परिस्थितीत अनेक क्रिकेट चाहते सोशल मीडियावर पृथ्वीला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत असतात. पृथ्वीने सोशल मीडियावर अशाच एका चाहत्याला उत्तर दिले आहे, जे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर एका सोशल मीडिया वापरकर्त्याने पृथ्वीच्या एका फोटोला कमेंट केली आहे. त्यात त्याने लिहले आहे की, “पृथ्वी भाई पोरींचा नाद सोड अणि विराट कोहली सारखे शरीर बनव. जे प्रयत्न विराटने केले आहेत तसे काही तर कर. “या कमेंटचे उत्तर देताना शॉने लिहले आहे की, “जी पंडित जी, जैसी आपकी मर्जी”
— Pushkar (@musafir_hu_yar) August 24, 2023
पृथ्वी शॉचा इंग्लंड मध्ये फॉर्म
शॉच्या फिटनेस बद्दल बोलायचे झाले तर त्याचे सध्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले की लगेच समजते त्याचे वजन वाढले आहे. परंतु, त्याचा फॉर्म परत आला आहे. इंग्लंड काउंटी 50 षटकांच्या स्पर्धेत शॉने जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने अवघ्या चार डावात 143 च्या सरासरीने आणि 152 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 429 धावा केल्या. यादरम्यान त्याने सॉमरसेटविरुद्ध 244 धावांची विक्रमी द्विशतक खेळीही खेळली. (prithvi shaw replied on instagram user)
महत्वाच्या बातम्या-
सेलिब्रेशन बनता है! रांचीत धोनीने सीएसके फॅनसोबत साजरा केला आनंद, व्हिडिओ पाहा
आकडे म्हणतायेत नंबर 4 श्रेयसचाच! आशिया कप आणि वर्ल्डकपआधी टीम इंडिया निवांत