दिग्गज एमएस धोनी याच्या नेतृत्वात त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जने चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. पण आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले. रवींद्र जडेजा सीएसकेचा नवीन कर्णधार बनला आहे. धोनीने घेतलेल्या निर्णयाचे दक्षिण अफ्रिकी दिग्गज एबी डिविलियर्सने स्वागत केले आहे. डिविलियर्सच्या मते धोनीने योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे.
दक्षिण अफ्रिका संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी तुफानी फलंदाजी केलेल्या एबी डिविलियर्स (AB de Villiers) याच्याकडून धोनीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. व्हीयू स्पोर्स्ट्ससोबत बोलताना डिविलियर्स म्हणाला, “मी एमएसने उचललेल्या पावलामुळे हैराण नाही. एवढ्या मोठ्या काळापर्यंत कर्णधारपदाचे ओझे वाहिल्यानंतर लोकांना वाटत असेल की, कर्णधार बनणे सोपे आहे, पण प्रत्यक्षात हे काम तुम्हाला थकवते. कधी-कधी तुम्हाची रात्रीची झोप उडते, खासकरून तेव्हा, जेव्हा तुमचा सीजन चांगले जात नसतात.”
डिविलियर्सच्या मते आयपीएल २०२० मधील सीएसकेच्या खराब प्रदर्शनामुळे धोनीला ठेच पोहोचली असेल, पण त्याने पुढच्याच हंगामात जोरदार पुनरागमन केले. “मला वाटते त्याने योग्य वेळी माघार घेतली, शेवटचा आयपीएल हंगाम जिंकल्यानंतर. शेवटच्या हंगामाच्या आधीच्या हंगामामुळे त्याला खूप ठेच पोहोचवली असेल. त्यानंतर पुनरागमन करणे आणि पुन्हा ट्रॉफी जिंकून म्हणणे की, मी अजून खेळणार आहे, पण कोणतेच पद घेणार नाही आणि संघाच्या समर्थनासाठी त्याठिकाणी उपस्थित राहील. त्याने हे अगदी योग्य पाऊल उचलले आहे,” असेही डिविलियर्स म्हणाला.
दरम्यान, एमएस धोनी आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने सीएसकेला चार आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत १२ आयपीएल हंगामात सीएसकेचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ११ वेळा संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवले. आता या हंगामापासून रवींद्र जडेजाच्या खांद्यावर जबाबदारी असेल की, त्याने धोनीप्रमाणेच नेतृत्व करावे आणि संघाला त्यांची पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकवून द्यावी.
महत्वाच्या बातम्या –
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण
PBKS vs RCB| दोन नव्या कर्णधारांची कसोटी, अशी असू शकते पंजाब-बेंगलोर संघांची प्लेइंग इलेव्हन
लाईव्ह आयपीएल सामन्यादरम्यान जागे झाले धोनीचे फुटबॉल प्रेम, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल