---Advertisement---

कोहलीचं टेन्शन वाढलंय, स्फोटक फलंदाजाचा आहे विराटच्या बॅटवर डोळा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2020 5:55 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलिअर्स हे क्रिकेट जगतातील एक मोठे नाव आहे. तो आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्या आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत आहे. डिविलिअर्स आणि कोहली या दोघांनीही या हंगामात चांगलीच फटकेबाजी केली आहे. महान फलंदाज गावसकरांनी या दोघ्यांचा जोडीचा उल्लेख ‘जय-विरु’ ची जोडी असा केला होता. मात्र डिविलिअर्सला त्याच्याच जोडीदाराची बॅट चोरायची आहे असे खुद्द त्यानेच सांगितले आहे.

बेंगलोर आणि पंजाब यांच्यात गुरुवारी (15 ऑक्टोबर) झालेल्या सामन्याच्या एक दिवस आधी आरसीबीच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आपल्या क्रिकेटकिट बद्दल माहिती देत आहे.

विराट कोहली त्याच्या क्रिकेट किटची बॅग उघडतो आणि त्याच्याकडे किती बॅट, पॅड, जोडे किंवा इतर वस्तू आहेत हे सांगतो. कोहली या गोष्टींबद्दल माहिती देत असतानाच एबी डिविलिअर्स तिथे येतो. त्यानंतर कोहली म्हणतो की ‘माझ्या या जोडीदाराशिवाय मी सराव करू शकत नाही.’

डिविलिअर्स जवळ येऊन कोहलीची किट उचलतो आणि म्हणतो की. “याने तुम्हाला सर्व माहिती दिली नाही. बॅगच्या या भागात त्यांने आपली बॅट लपवली आहे आणि मला सांगायचे आहे की मला त्याची बॅट खूप आवडते. त्याने ही बॅट कुठेही लपवून ठेवली तरी मी ही बॅट एक दिवस चोरणारच.”

https://twitter.com/RCBTweets/status/1316219679417929730?s=20

बुधवारी (14 ऑक्टोबर) दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान विराट कोहलीचा हा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर दाखवण्यात आला होता. यावर माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर म्हणाले, “विराट आणि एबी शोले चित्रपटातील जोडीसारखे (जय-वीरू) आहेत. ते जय आणि विरूआहेत. ते खेळपट्टीवर टिकले तर गोलंदाजांची कसोटीच लागते”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---