दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि मिस्टर 360 नावाने ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की तो क्रिकेटच्या मैदानावर परत येऊ शकतो. डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने 2021 मध्ये पूर्णपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता डिव्हिलियर्स पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज असल्याचे दिसते. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी डिव्हिलियर्सने मोठा निर्णय घेतला आहे.
डिव्हिलियर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या दुसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहे. डिव्हिलियर्स या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सकडून खेळेल. तो स्पर्धेती संघाचे नेतृत्व करेल. अशाप्रकारे, डिव्हिलियर्स निवृत्तीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतेल.
चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये निवृत्त आणि करार न केलेले खेळाडू खेळताना दिसतात. ज्यामध्ये एबी डिव्हिलियर्सचाही समावेश होणार आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेटच्या दिग्गजांना पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची संधी मिळते.
डिव्हिलियर्सने त्याच्या अलिकडच्या मुलाखतीत म्हटले होते की, “मी पुन्हा क्रिकेट खेळू शकतो. जरी काहीही निश्चित नसले तरी, मला वाटते की माझी मुलं माझ्यावर दबाव आणत आहेत. मला वाटते की मी त्यांच्यासोबत नेट्समध्ये खेळेन. पण जर मला ते आवडले तर मी कदाचित कुठेतरी जाऊन पुन्हा कॅज्युअल क्रिकेट खेळू शकेन.” मात्र, डिव्हिलियर्सने स्पष्ट केले होते की तो आयपीएल किंवा दक्षिण आफ्रिकेसाठी कोणत्याही प्रकारचे पुनरागमन करणार नाही.
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. उल्लेखनीय म्हणजे त्याने 191 कसोटी डावांमध्ये 50.66 च्या सरासरीने 8765 धावा केल्या. ज्यामध्ये 22 शतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय 218 एकदिवसीय डावांमध्ये एबीने 53.50 च्या सरासरीने 9577 धावा केल्या. ज्यामध्ये 25 शतके आणि 53 अर्धशतकांचा समावेश होता. उर्वरित 75 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये, डिव्हिलियर्सने 26.12 च्या सरासरीने 1672 धावा केल्या.
हेही वाचा-
रणजी सामन्यासाठी विराट दिल्ली संघात सामील, घरच्या मैदानावर कोहली अनोख्या अंदाजात, पाहा VIDEO
राजकोटमध्ये टीम इंडिया विजयाची हॅट्ट्रीक करणार का? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
अफगाणिस्तानच्या खेळाडूनं रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकला हा मोठा आयसीसी पुरस्कार