---Advertisement---

भारतातून मिळणाऱ्या प्रेमाची डिविलियर्सने केली परतफेड, भारतीयांबद्दल केले मन जिंकणारे भाष्य

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 7:47 PM
---Advertisement---

आजपासून इंडियन प्रीमियर लीगचे १४ वे हंगाम सुरू होणार आहे. या हंगामातील पहिली लढत गतवर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. अशातच हा सामना सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा खेळाडू एबी डिविलियर्सने भारतीय क्रिकेट चाहत्यांबद्दल मन जिंकून घेणारे भाष्य केले आहे.

एबी डिविलियर्स हा एकमात्र परदेशी खेळाडू आहे. ज्याला भारतातही तितकेच प्रेम आणि पाठिंबा दिला जातो, जितके भारतीय क्रिकेटपटूंना मिळते. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी त्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांबदल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने म्हटले की, “हे माझ्यासाठी खूप विशेष आहे की जेव्हा जेव्हा मी भारतात येतो, तेव्हा माझे अशाच प्रकारे स्वागत केले जाते. मला इथे यायला आवडते आणि यावेळी माझे कुटुंबसुद्धा इथे आहे. यावेळी माझी तिन्ही मुले माझ्याबरोबर असतील, म्हणून मला एक वेगळा अनुभव येईल.

तसेच यंदाच्या आयपीएल हंगामात प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी कोरोनाच्या धोक्यामुळे देण्यात आलेली नाही. याबाबत जेव्हा एबी डिविलियर्सला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, “मला प्रेक्षकांची कमतरता नक्कीच जाणवेल. आशा व्यक्त करतो की, लवकर प्रेक्षक मैदानावर सामना पाहण्यासाठी येतील. या हंगामात मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. हा खूप मोठा प्रवास असणार आहे. अशी आशा व्यक्त करतो की, आम्ही भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करू.”

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात: टॉस जिंकून बंगळुरुचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नवे अँथम साँग ऐकले का? यंदा काय आहे विशेष पाहा व्हिडिओ

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर संघाच्या चिंतेत वाढ, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---