पाकिस्तान आणि इंग्लंड या संघामध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (दि. 9 डिसेंबर) मुलतान येथे खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संंपला. दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या फलंदाजांनी जलदगतीने धावा केल्या. मात्र, पाकिस्तान संघामध्ये पदार्पण करणाऱ्या अबरार एहमद याने गोलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेताच इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. 24 वर्षीय युवा गोलंदाजांने पहिल्या सत्रात 5 गडी बाद केले. तसेच दुसऱ्या सत्रात 2 गडी बाद केले, ज्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचा देखील समावेश आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्स (Ben Stokes) जलद धावा करण्याचा प्रयत्न केला. त्याने 37 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या. मात्र, डावाच्या 43व्या षटकात अबरार एहमद (Abrar Ahmed) गोलंदाजीसाठी आला. त्याने षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सला त्रिफळाचित केले. हा चेंडू अबरारने गुगली टाकलेला, पण स्टोक्स गुगली समजण्यात असमर्थ राहिला आणि बचावात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्रिफळाचित झाल्यानंतर कर्णधार स्टोक्स निराश दिसला.
This. Is. Special. 🤯#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/ExgHlMfrxY
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 9, 2022
पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडच्या फलंदाजाचे लोटांगण
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी जलद गतीने धावा करायला सुरुवात केली. एक वेळ अशी आली की संघाचा रनरेट 6 पेक्षा अधिक होता. मात्र, नंतर इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद होत गेले. मधल्या फळीतील एकही फलंदाज तग धरु शकला नाही आणि पूर्ण संघ 51.4 षटकात 281 धावांवर सर्वबाद झाला. इ्ंग्लंडसाठी बेन डकेट (Ben Duckett) आणि ओली पोप (Ollie Pope) यांनी अर्धशतके झळकावली . या सामन्यात पदार्पण करणाऱ्या अबरारने 7 गडी बाद केले तर जाहिद मेहमूद याने 3 गडी बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा आमचा पर्सनल मॅटर…’, सानियासोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर पाकिस्तानी क्रिकेटरने सोडले मौन
मूळचा पाकिस्तानी असलेला ‘हा’ खेळाडू खेळणार आयपीएल, लिलावात ठेवली 50 लाख बेस प्राईझ