---Advertisement---

कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम

On: शुक्रवार, मार्च 4, 2022 6:23 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान शुक्रवारपासून (४ मार्च) ऐतिहासिक कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तब्बल दोन तपानंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौरा करतोय. रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान पाकिस्तानने शानदार फलंदाजी करत पाहुण्या संघाला अडचणीत टाकले. सलामीवीर इमाम उल हकने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत पहिला दिवस पाकिस्तानच्या नावे केला. मात्र, केवळ आपला तिसरा कसोटी सामना खेळणाऱ्या सलामीवीर अब्दुल्ला शफिक याने आपल्या छोटेखानी मात्र लक्षवेधी खेळीने सर्वांची वाहवा मिळवली.

इमाम-अब्दुल्लाची शतकी भागीदारी

रावळपिंडी येथे सुरू झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर इमाम उल हक व अब्दुल्ला यांनी अत्यंत धैर्याने ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांचा सामना करत पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले. आपला केवळ तिसरा सामना खेळत असलेल्या शफिक याने ऑस्ट्रेलियन कर्णधार व दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स याला जशास तसे उत्तर दिले. त्याने कमिन्ससह स्टार्क, हेजलवूड, लायन, हेड या सर्वच गोलंदाजांविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. कमिन्सने त्याला सातत्याने बाद करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने त्याला दाद दिली नाही.

इमाम व शफिक यांनी पहिल्या सत्रात एकही बळी जाऊ दिला नाही. दोघांनी ३४ षटकात १०५ धावांची भागीदारी रचली. अखेरीस फिरकीपटू नॅथन लायनने शफिक याला ४४ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इमाम नाबाद १२२ तर अझर अली ५५ धावांवर खेळत होता.

महत्वाच्या बातम्या-

अगग! मोठमोठ्या विक्रमांत सोडा, नकोशा विक्रमांतही पंतने धोनीची केलीय बरोबरी; ९६ धावांवर झालाय बाद (mahasports.in)

…म्हणून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात, पाकिस्तानविरुद्ध खेळतायेत कसोटी (mahasports.in)

IND vs SL, 1st Test: विराट अर्धशतकापासून, तर पंत शतकापासून वंचित; पहिल्या दिवसाखेर भारताच्या ३५० धावा पार (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---