कॅच विन्स द मॅच या उक्तीप्रमाणे कोणत्याही क्रिकेट सामन्यात छोट्या-मोठ्या झेलला खूप महत्त्व असते. कारण एखाद्या फलंदाजाला झेल सुटल्यास तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला भलताच महागात पडल्याची बरीचशी उदाहरणे आहेत. लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२मधील ६६व्या सामन्यातही याचे उदाहरण पाहायला मिळाले. कोलकाताचा पदार्पणवीर अभिजीत तोमर याने क्विंटन डी कॉकचा झेल सोडला, जो संघाला खूप महागात पडला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनऊने (LSG vs KKR) प्रथम फलंदाजी निवडल्याने त्यांची ठरलेली सलामी जोडी, केएल राहुल आणि डी कॉक (Quinton De Kock) सलामीला फलंदाजीसाठी आले होते. पहिली २ षटके खेळून काढल्यानंतर तिसरे षटक टाकण्यासाठी कोलकाताकडून उमेश यादव आला होता. याच तिसऱ्या षटकादरम्यान डी कॉकला जीवनदान मिळाले.
उमेशचा पहिला चेंडू डॉट राहिल्यानंतर डी कॉकने आऊटर एजला फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या कोलकाताचा पदार्पणवीर अभिजीत तोमरला (Abhijeet Tomar) या संधीचा फायदा घेता आला नाही. त्याने झेल घेण्यासाठी पुढच्या बाजूने डाईव्हही मारली, परंतु तो चेंडू पकडण्यात (Abhijeet Tomar Dropped De Kock Catch) अपयशी ठरला. यावेळी डी कॉक अवघ्या १२ धावांवर खेळत होता.
सामन्याच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या जीवनदानाचा पुढे डी कॉकने चांगलाच फायदा उचलला. तो डावाखेर नाबाद राहिला आणि त्याने आपले शतकही पूर्ण केले. त्याने केवळ ५९ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. शतक झळकावल्यानंतरही त्याने आपल्या फलंदाजीचा वेग कमी केला नाही. त्याने पुढेही आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत डावाखेर नाबाद १४० धावा फटकावल्या. ७० चेंडू खेळताना १० षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने या धावा केल्या.
ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (Highest individual score in the IPL) आहे. यासह आयपीएल इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा तो ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्यूलमनंतर केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊचा २ धावांनी विजय, प्लेऑफसाठी मिळवली पात्रता
अजून कोणाकडून नव्हे तर ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकलाय ‘पंच सेलिब्रेशन’ची स्टाईल
केन विलियम्सच्या अनुपस्थितीत ‘हे’ तीन खेळाडू सांभाळू शकतात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्त्वपद