भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममधून जात आहे. संघाने नुकतेच बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर भारताला कांगारूंविरुद्ध महत्त्वाची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जावे लागणार आहे. त्यापर्वी मायदेशात टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ज्याची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांच्या या प्रतिक्षेदरम्यान, भारतीय संघाला एक नवा सलामीवीर मिळाला जो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो.
टीम इंडियाचा नवा ओपनिंग बॅट्समन दुसरा कोणी नसून स्टार फर्स्ट क्लास बॅट्समन अभिमन्यू ईश्वरन आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यूची बॅट सतत आग ओकत आहे. तो एकापाठोपाठ एक शतके झळकावत आहे. ज्याचा प्रत्यय इराणी कपमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या फलंदाजीच्या जोरावर अभिमन्यू सातत्याने भारतीय संघात निवड होण्याचा जोरदार दावा करत आहे.
इराणी चषकात रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळणाऱ्या अभिमन्यूने स्फोटक फलंदाजी केली आहे. संघाकडून खेळताना त्याने सामन्याच्या चाैथ्या दिवशी 291 चेंडूत 191 धावा केल्या. दुहेरी शकतापासूम तो केवळ 9 धावा दूर राहीला. पण त्यांची ही खेळी द्विशतकापेक्षा निश्चितच कमी नाही. अभिमन्यूने आपल्या खेळीत 16 चाैकार आणि 1 षटकार ठोकला. ज्याच्या जोरावर संघ सन्मानजनक धावसंख्येकडे आगेकूच करत आहे. त्याने 5 व्या विकेटसाठी ध्रुव जुरुेल (91) सोबत 165 धावाची भागीदारी केली. ध्रुव जुरुेलने देखील 91धावांची आक्रमक खेळी खेळली. तो देखील शतकपासून 9 धावा दूर रहिला. शम्स मुलाणीने दोघांना तंबूत पाठवून मुंबईचे सामन्यात पुनरागमन केले आहे. चाैथ्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत रेस्ट ऑफ इंडिया 400/6 अश्या स्थितीत आहे.
HUGE Wicket Alert 🚨
Shams Mulani gets the big wicket of Abhimanyu Easwaran (191), who misses out on his double ton by 9 runs!
A magnificent innings from Easwaran 👏
2 wickets in 2 overs for Mulani 🙌#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/U4XQot1FeV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 4, 2024
शेवटच्या 5 प्रथम श्रेणी सामन्यांवर नजर टाकली तर त्यात त्याने 5 शतके झळकावली आहेत. या 5 शतकांमध्ये त्याने द्विशतकही ठोकले आहे. ईश्वरनने आज आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील २६ वे शतक झळकावले आहे.
सध्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला चमकदार कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत अभिमन्यूला संधी मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. तथापि, तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी किंवा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅकअप सलामीवीर म्हणून भारतीय संघाचा भाग असू शकतो. अभिमन्यू हा याआधीही भारतीय संघाचा भाग होता. जरी त्याला अद्याप संघासाठी कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळावी. अशी मागणी चाहते करत आहेत.
हेही वाचा-
सर्फराज खान भावूक, दुखापतग्रस्त भाऊ मुशीरला समर्पित केली द्विशतकी खेळी
वयाच्या 12 व्या वर्षी दिल्लीला पोहोचला, राहण्यासाठी घर नव्हते; या स्टार खेळाडूची कारकीर्द खूपच संघर्षमयी
नीरज चोप्राला सुपरस्टार बनवणाऱ्या प्रशिक्षकाने पदभार सोडले, जाणून घ्या कारण