---Advertisement---

महाराजा टी20 ट्रॉफी: मयंक-पडिक्कलला पछाडत हा ‘अनकॅप्ड’ झाला मालामाल, मनिष पांडेला…

On: शनिवार, जुलै 22, 2023 10:53 PM
---Advertisement---

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेची सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेसाठी शनिवारी (22 जुलै) खेळाडूंचा लिलाव पार पडला. सहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या लिलावात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश होता. मात्र, या खेळाडूंना पछाडत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला आक्रमक फलंदाज अभिनव मनोहर याने सर्वात मोठी बोली घेत लिलाव गाजवला.

बेंगलोर येथे झालेल्या या लिलावात तब्बल 60 खेळाडूंवर बोली लागली. यापूर्वीच काही खेळाडू प्रत्येक संघाने आपल्याकडे ठेवल्याने उर्वरित खेळाडूंचा लिलाव करण्यात आला होता. प्रत्येक संघाला यावेळी 50 लाखांची पर्स उपलब्ध करून देण्यात आलेली.

या लिलावात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघासाठी खेळणाऱ्या अभिनव मनोहर याला सर्वाधिक रकमेची बोली लागली. शिवमोगा लायन्स संघाने तब्बल 15 लाख रुपये दे त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका निभावलेला कर्नाटकचा माजी कर्णधार मयंक अगरवाल याला बेंगलोर ब्लास्टर संघाने 14 लाखांची किंमत दिली. तर युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला गुलबर्ग मिस्टिक्सने 13.2 लाखांची बोली लावली.

भारतीय संघासाठी अनेक वर्ष खेळलेल्या मनीष पांडे याला हुबळी टायगर्सने 10.6 लाख रुपये देत आपल्या संघाचा भाग बनवले. तर, करूण नायरला 6.80 लाख रुपये देत म्हैसूर वॉरियर्सने करारबद्ध केले. तसेच, अभिमन्यू मिथुन याला बेंगलोर ब्लास्टर्सने 5.2 लाखात आपल्या संघात सामील करून घेतले. यासोबतच अष्टपैलू कृष्णप्पा गौतमसाठी मेंगलोर ड्रॅगन संघाने 6.6 लाख रुपये मोजले.

ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यात खेळली जाईल. मागील वर्षी मनीष पांडेचे नेतृत्वातील हुबळी टायगर्स संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

(Abhinav Manohar Become Costliest Player In Maharaja T20 Trophy Mayank Padikkal Got Big)

महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतचा रूद्रावतार! सामन्यानंतर काढले बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे वाभाडे, म्हणाली…
“सध्या बेअरस्टो जगातील सर्वोत्तम फलंदाज”, दिग्गजाने मॅंचेस्टर कसोटीतील खेळीनंतर वाहिली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---