महाराज ट्रॉफीमध्ये काल (24 ऑगस्ट) रोजी शिवमोग्गा लायन्स आणि हुबळी टायगर्स बेंगळुरू येथे सामना खेळला गेला. या सामन्यात अभिनव मनोहरने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. अभिनवने गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. त्याने अवघ्या 27 चेंडूत 70 धावा केल्या. या दरम्याने त्याने 9 षटकार मारले. अभिनव मनोहरने शिवमोग्गाकडून मॅच विंनिंग खेळी खेळली. शिवमोग्गाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.
वास्तविक, हुबळीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकांत सर्वबाद 141 धावा केल्या. यादरम्यान कर्णधार मनीष पांडेने 44 धावा केल्या. त्याने 31 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तसेच मनवंत कुमारने 13 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 4 षटकार मारले. प्रत्युत्तरात शिवमोग्गाने 15.1 षटकांत सामना जिंकला. संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
Abhinav Manohar in Maharaja T20 Trophy 2024:
52*(29)
84*(34)
5(8)
17(12)
55(36)
46(29)
70(27)This is just remarkable consistency by him considering his team having lost all 6 games in this tournament. ????????????#AbhinavManohar #MaharajaTrophy #MaharajaT20 pic.twitter.com/cJAcqjMN9
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) August 24, 2024
आयपीएलमधील गुजरात संघाचा स्टार शिवमोग्गासाठी अभिनव मनोहर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 27 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 9 षटकार मारले. ज्यामध्ये मनोहरचा स्ट्राईक रेट 259.26 होता. त्याआधी कर्णधार निहालने 34 चेंडूत 37 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
महाराज ट्राॅफीच्या स्पर्धेत मनोहरने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने म्हैसूर वॉरियर्सविरुद्ध 46 धावांची खेळी खेळली होती. गुलबर्गा मिस्टिक्सविरुद्धही अर्धशतक झळकावले होते. ज्यात त्याने 55 धावा केल्या होत्या. अभिनव मनोहरने आतापर्यंत एकूण 36 टी20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 623 धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट ए चे 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अर्धशतक झळकावले आहे.
हेही वाचा-
सुट्टी संपली! बांग्लादेश मालिकेपूर्वी कर्णधाराने कंबर कसली; अभिषेक नायरसोबत…
भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल स्टार खेळाडूनं केलं खळबळजनक वक्तव्य! म्हणाला…
राहुल द्रविडच्या मुलाला सूर गवसेना, पुन्हा छोटेखानी खेळीवर बाद; संघाचाही तिसरा पराभव






