भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर अभिनव मुकुंद याने भारताचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव आणि सध्या संघाबाहेर असलेला यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. रिषभ पंतच्या मदतीने कुलदीप यादवची कारकीर्द पुन्हा योग्य मार्गावर आल्याचे मुकुंद याने म्हटले
कुलदीप यादवने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तेव्हापासून त्याची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. कुलदीप बऱ्याच वेळा राष्ट्रीय संघाच्या आत-बाहेर झाला आहे तसेच दुखापतींचाही त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आहे.
एका मुलाखतीत बोलताना मुकुंद म्हणाला,
“कुलदीप यादव रिषभ पंतला खूप मानतो. कारण, त्याच्या मदतीने त्याची कारकीर्द पुन्हा रुळावर आली. आयपीएल दरम्यान पंतने कुलदीप यादवला खूप मदत केली, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास परत आला. त्यानंतर तो नव्या उर्जेने मैदानात परतला.”
आयपीएल 2022 मध्ये कुलदीप प्रथमच दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत होता. त्यावेळी पंत दिल्ली संघाचा कर्णधार होता. कुलदीप यादवने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर स्वत:ला सिद्ध केले. वनडे आणि टी20 अशा दोन्ही मालिकांमध्ये बळी मिळवले. तो दोन्ही मालिकांमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
मुकुंद याने आगामी वनडे विश्वचषकासाठी कुलदीप यादव याला भारताचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू म्हटले. या विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप व रवींद्र जडेजा यांची जागा पक्की झाल्याचे तो म्हणाला. या शर्यतीत युजवेंद्र चहल काहीसा मागे पडल्याचे त्याने म्हटले. यावर्षी भारतातच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळला जाईल. भारतातील फिरकीच्या मदतगार खेळपट्ट्यांवर भारतीय संघाकडे तीन अनुभवी फिरकीपटू असतील.
(Abhinav Mukund Said Rishabh Pant Help Kuldeep Yadav For His Growing Career)
महत्वाच्या बातम्या –
रांचीत हॉन्डा रॅपसॉल घेऊन फिरतोय एमएस धोनी, नवा व्हिडिओ तुफान व्हायरल
IND vs AUS । विश्वचषकापूर्वी कमिन्स करणार मैदानात पुनरागमन, शेवटच्या ऍशेस कसोटीत झालेली दुखापत