कोल्हापूर: कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन(केएसए) व कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2022स्पर्धेत मुलांच्या गटात अभिराम निलाखे, विश्वजीत सणस यांनी तर मुलींच्या गटात श्रावणी देशमुख, रितिका डावलकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या अभिराम निलाखे याने मुंबईच्या आयुषमान गोयलचा 4-1,4-0असा सहज पराभव केला. चौथ्या मानांकित पुण्याच्या विश्वजीत सणस याने औरंगाबादच्या आदिब शेखला 4-1,4-0 असे नमविले. दुसऱ्या मानांकित नाशिकच्या अंशीत देशपांडे याने मुंबईच्या सौमिल चोपडेचा 4-0,5-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. औरंगाबादच्या तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफ़ुले याने अमरावतीच्या देवराज मांडलेला 4-0,4-2 असे पराभूत केले.
मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या श्रावणी देशमुख हिने सोलापूरच्या रिया गांधीचा 4-1, 4-0 असा तर, कोल्हापूरच्या रितिका डावलकरने सोलापूरच्या स्वरांजली नारळेचा 5-3, 4-2 असा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेचे उदघाटन एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, मार्व्हलस मेटल इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन संग्राम पाटील, केडीएलटीए उपाध्यक्ष दिनेश कित्तूर, केडीएलटीएचे संचालक महेंद्र परमार, उद्योजक दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केडीएलटीए सचिव आशिष शहा, संस्थापक सदस्य एस.एस.मोमीन, मेघन बागवडे, मुरलीधर घाटगे, एमएसएलटीएचे विभागीय समन्वयक शितल भोसले, हिमांशू गोसावी, स्पर्धा निरीक्षक मानल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 14 वर्षाखालील मुले:
अभिराम निलाखे(पुणे)(1) वि.वि.आयुषमान गोयल(मुंबई)4-1,4-0
अंशीत देशपांडे(नाशिक)(2) वि.वि.सौमिल चोपडे(मुंबई)4-0,5-3
शिवतेज शिरफ़ुले(औरंगाबाद)(3) वि.वि.देवराज मांडले(अमरावती)4-0,4-2
विश्वजीत सणस(पुणे)(4) वि.वि.आदिब शेख(औरंगाबाद)4-1,4-0
14 वर्षाखालील मुली: उप-उपांत्यपूर्व फेरी:
शांभवी सोनावणे(नाशिक)वि.वि.ईश्वरी मार्कंडे(औरंगाबाद)4-0, 4-0
अभिलिप्सा मल्लिक(नवी मुंबई)वि.वि.ध्रुवी हलके(यवतमाळ)4-0, 4-0
रितिका डावलकर(कोल्हापूर)वि.वि.स्वरांजली नारळे(सॊलापूर)5-3, 4-2
श्रावणी देशमुख(पुणे)वि.वि.रिया गांधी(सोलापूर)4-1, 4-0
अवंती वाघ(सातारा)वि.वि.गीत चरडे(यवतमाळ)4-0, 4-2
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांच्या निर्णयामुळे काव्या झाली होती उदास; पण पुढच्याच षटकात घडले असे काही की परतली स्माईल
धोनीच्या सीएसकेची दाणादाण उडवणारा पदार्पणवीर वैभव अरोरा, एकेकाळी क्रिकेटला ठोकणार होता रामराम
कोण आहे जीतेश शर्मा? ज्याने आयपीएल पदार्पणात स्टार क्रिकेटर धोनीला बाद करण्यात दिले योगदान