भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. जो की भारतीय संघाने 7 विकेट्सने जिंकला. या विजयासह संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाला 133 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. जे की भारताने अभिषेक शर्माच्या 79 धावांच्या जलद खेळीच्या जोरावर केवळ 12.5 षटकांत पूर्ण केले. या खेळीसह अभिषेकने युवराज सिंगचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला. अभिषेकने त्याच्या खेळीदरम्यान फक्त 34 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 8 षटकारही मारले.
या सामन्यापूर्वी, भारतीय संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. ज्याने 2007 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात डरबन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सर्वाधिक षटकार मारले होते. त्याने त्याच्या 58 धावांच्या खेळीत एकूण 7 षटकार मारले. आता, अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध भारतासाठी टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनण्याचा त्याचा 18 वर्षांचा जुना विक्रम मागे टाकला आहे. तसेच अभिषेक आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही टी20 सामन्यात दोन्ही संघांकडून एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यानंतर 79 धावांच्या त्याच्या शानदार खेळीबद्दल बोलताना अभिषेक शर्मा म्हणाला की, मला मैदानावर माझा खेळ मोकळेपणाने खेळायचा होता, ज्यासाठी कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांनीही मला स्वातंत्र्य दिले होते. या विकेटवर दुहेरी उसळी होती आणि आमच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. मला वाटले होते की आपण 160 ते 170 धावांचे लक्ष्य मिळेल, पण गोलंदाजांनी खूपच चांगली कामगिरी केली. आम्ही सलामी करताना सतत एकमेकांशी बोलत राहतो. त्यामुळे संजूसोबत सुरुवात करताना मला खूप छान वाटते. आयपीएलने मला खूप मदत केली आहे. मी असे संघ वातावरण पाहिले नाही जिथे कर्णधार आणि प्रशिक्षक तुमच्याशी इतक्या मोकळेपणाने आणि सहजपणे बोलु शकतात.
हेही वाचा-
IND vs ENG; अभिषेक शर्माचे तुफानी अर्धशतक! भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा
IND vs ENG; अर्शदीप सिंगने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर…! जसप्रीत बुमराहचे वर्चस्व, तर जडेजाही अव्वल स्थानी