---Advertisement---

अभिषेक शर्माची झंझावती खेळी; अवघ्या 28 चेंडूत ठोकले शतक, या विश्वविक्रमाशी बरोबरी

---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एकामागून एक भारतीय फलंदाज सातत्याने दमदार खेळी करत आहेत. आता यामध्ये डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने देखील उडी मारली आहे. त्याने आज मेघालयविरुद्ध शानदार फलंदाजी करत सर्व विक्रम मोडीत काढले. अभिषेक शर्माने अवघ्या 28 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. जे की टी20 मध्ये भारतीयाद्वारे संयुक्त सर्वात वेगवान शतक ठरले आहे. अभिषेकने उर्विल पटेलने आठ दिवसांपूर्वी 27 नोव्हेंबरला केलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

अवघ्या 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेकने पंजाबला धडाकेबाज सुरुवात करून दिली आणि अवघ्या तीन षटकांत संघाची धावसंख्या पन्नाशीपर्यंत पोहोचवली. अभिषेकने पहिल्या 10 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. त्याने अवघ्या 14 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. ज्यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.

यानंतरही अभिषेकची बॅट शांत राहिली नाही. त्याने 28 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शेवटी 29 चेंडूत 106 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने आपल्या एकूण खेळीत 8 चौकार आणि 11 षटकार मारले. अभिषेकने 106 पैकी 98 धावा केवळ चौकारांच्या जोरावर केल्या. गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज उर्विलने त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत शतक झळकावले होते. त्याने रिषभ पंतचा 32 चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रम मोडला आणि टी20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो भारतीय बनला आहे. विशेष म्हणजे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावात उर्विलला कोणत्याही संघाने विकत घेतलेले नाही.

अभिषेक शर्माने टी20 इंटरनॅशनलमध्येही शतक झळकावले आहे. या वर्षी त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना त्यांच्याविरुद्ध 46 चेंडूत शतक झळकावले होते. तो 47 चेंडूंत 7 चौकार आणि आठ षटकारांसह 100 धावा करून बाद झाला. सलग तीन षटकार ठोकत अभिषेकने आपले शतक पूर्ण केले होते. यावरून तो किती आक्रमक फलंदाज आहे, हे दिसून येते. ज्यात अभिषेकने पहिल्या 30 चेंडूत केवळ 41 धावा केल्या होत्या. पुढच्या 17 चेंडूत त्याने 59 धावा केल्या होत्या.

हेही वाचा-

IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, 519 ​​दिवसांनी या खेळाडूचे कमबॅक
रेकाॅर्डब्रेक..! टी20 मध्ये वनडे इतकी टोटल, 20 षटकांत या संघाने ठोकल्या चक्क 349 धावा
IND VS AUS; ॲडलेडची खेळपट्टी फलंदाजांची डोकेदुखी? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---