भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची धमाकेदार सुरुवात केली. ज्यामध्ये पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने यजमाननांचा 295 धावांनी धुव्वा उडवला. आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हल स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. ज्यामध्ये पुन्हा एकदा प्रत्येकाला गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळेल. डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये, बहुतेक वेगवान गोलंदाजांचे वरचढ असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत या सामन्याच्या खेळपट्टीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ॲडलेड ओव्हलचे पिच क्युरेटर डॅमियन हॉग यांनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच दोन्ही संघांच्या फलंदाजांना धक्का बसला आहे.
ॲडलेड ओव्हलचे पिच क्युरेटर डॅमियन हॉग यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळपट्टीत 6 मिमी गवत शिल्लक सोडले जाईल. ज्यामुळे पहिल्या दोन दिवसात वेगवान गोलंदाजांना खूप मदत होईल. जसजसा खेळ पुढे जाईल तसतसे फिरकीपटूही चांगली कामगिरी करू शकतील. या ठिकाणी रात्री फलंदाजी करणे सोपे नाही. जे आम्ही मागील सामन्यांमध्ये देखील पाहिले आहे. गवत सोडण्यामागचे आमचे कारण खेळपट्टीवरून चांगला वेग आणि उसळी मिळवणे हे होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही ही खेळपट्टी तयार केली आहे. फिरकीपटूंनाही खेळपट्टीवर गवत असल्याने त्यांचा चेंडू वेगाने बाहेर पडू शकतो. ज्यामुळे फलंदाजांना खेळणे सोपे जाणार नाही. मात्र, जसजसा चेंडू जुना होईल, तसतशी या खेळपट्टीवर फलंदाजी करणे निश्चितच थोडे सोपे होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 6 डिसेंबरला पावसाची शक्यता 88 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नाणेफेकीची भूमिका खूप महत्त्वाची असेल. कारण कोणताही संघ जिंकेल तो खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. भारताने गेल्या वेळी ॲडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूचा सामना खेळला होता. तो तीन दिवसांत संपला होता. ज्यामध्ये टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 36 धावांवर आटोपला होता.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अंतिम निर्णय लवकरच, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांची काही तासांत महत्वाची बैठक
वयाच्या 22 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा, आता हा भारतीय क्रिकेटर झाला 70 हजार कोटी रुपयांचा मालक
“त्यानं पाचव्या किंवा ….” , ॲडलेड कसोटीपूर्वी माजी प्रशिक्षकानं रोहित शर्माला दिला सल्ला






