---Advertisement---

अबू धाबी टी१० लीगमधील ‘या’ संघाचं भविष्य ड्वेन ब्राव्होच्या हाती; सोपवली कर्णधारपदाची धुरा

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 7:58 AM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होकडे एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला अबू धाबी टी१० लीगच्या आगामी हंगामासाठी दिल्ली बुल्स संघाचा कर्णधारपद बनवले आहे. ब्राव्होने नुकतेच करार केला होता, त्यामुळे तो आता ऑयन मॉर्गनच्या जागी दिल्ली बुल्स संघाचे नेतृत्त्व करेल.

मागील वर्षी दिल्ली बुल्स संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता. त्यामुळे येत्या हंगामासाठी त्यांनी आपल्या संघात अनेक बदल केले आहेत. ब्राव्होव्यतिरिक्त एविन लुईसलादेखील संघात सामील करण्यात आले आहे. तसेच, शेर्फेन रुदरफोर्ड, युएसचा वेगवान गोलंदाज अली खान, अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू मोहम्मद नबी आणि श्रीलंकेचा दुशमंथा चमीरा यांना संघाने रिटेन केले आहे.

दिल्ली बुल्सने आपल्या प्रशिक्षण विभागातही केले बदल
दिल्ली बुल्सने आपल्या प्रशिक्षण विभागातही मोठे बदल केले आहेत. स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी त्यांनी एँडी फ्लॉवर यांना येत्या हंगामासाठी आपल्या संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. फ्लेमिंग यांच्या प्रशिक्षणाखाली बुल्सने मागील २ वर्षात कमी- अधिक प्रमाणात चांगली कामगिरी केली. याव्यतिरिक्त त्यांंनी अझर महमूद आणि जेम्स फोस्टर यांनाही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.

फ्लॉवर हे आपल्या काळातील खूप मोठे क्रिकेटपटू होते. त्यांना झिम्बाब्वेच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. सर्वोत्तम फलंदाजाव्यतिरिक्त ते एक जबरदस्त प्रशिक्षक म्हणूनही सिद्ध झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संघांना प्रशिक्षण दिले आहे. सन २०१३ साली जेव्हा इंग्लंडने ऍशेस मालिकेत विजय मिळवला होता, तेव्हा ते इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होते. याव्यतिरिक्त २०१९ मध्ये ते अबू धाबी येथे टी१० लीगची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचेही प्रशिक्षक होते.

मागील हंगामात ब्राव्होने केले मराठा अरेबियन्सचे नेतृत्त्व
मागील हंगामात ब्राव्होने मराठा अरेबियन्स संघाचे नेतृत्त्व केले होते. त्याने मागील हंगामात एकूण ८ सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या होत्या, तर फलंदाजी करताना त्याला खास कामगिरी करता आली नाही. तो केवळ ४ धावा करू शकला.

त्याच्या नेतृत्त्वात मराठा अरेबियन्सने मागील हंगामात विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

रिकी पाँटिंगने पृथ्वी शॉबद्दल केलेली ‘ही’ भविष्यवाणी ठरली खरी

कर्णधार असावा तर असा! अंगठ्यातून रक्त येत असतानाही दाखवली विराटने ‘हिम्मत’

…अन विराट बाद असूनही राहिला नाबाद; वाचा काय आहे प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---