सध्या अबू धाबी टी-१० लीगने सर्वांना अक्षरशः वेड लावून सोडले आहे. टी-१० लीग हे क्रिकेटमधील सर्वात जलद स्वरुप आहे. १० षटकांच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसतो आणि अनेक विक्रमही मोडले जातात. टी-१० लीग २०२१ मध्ये क्रिस गेल, निकोलस पुरण, शोएब मलिक यांसारख्या मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंनीही सहभाग नोंदवला आहे. अशातच टीम अबु धाबी विरुद्ध नॉर्थन वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात काही वेगळेच दृश्य पाहायला मिळाले, ज्यावर तुम्हाला हसू आवरणे कठीण होईल.
कपडे बदलण्याच्या नादात चौकार सोडला
झाले असे की, या सामन्यातील दुसऱ्या डावात नॉर्थन संघातील लींडल सीमन्स आणि वसीम मोहम्मद फलंदाजी करत होते. दुसरीकडे अबू धाबी संघातील खेळाडू रोहन मुस्तफा हा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. अशात डावातील तिसऱ्या षटकातील एका चेंडूवर वसीमने जोरदार शॉट मारला. आणि योगायोगाने त्याचवेळी सीमारेषेजवळ थांबलेला मुस्तफा कपडे बदलत होता. तरीही कसबसे अंगावरील कपडे सांभाळत तो चेंडूच्या मागे धावला. परंतु तोवर चेंडू सीमारेषेबाहेर गेला आणि वसीमला चौकार मिळाला.
परंतु मुस्तफाचे कृत्य पाहून स्टेडियममधील सर्व प्रेक्षक हसायला लागले. अक्षरश नॉर्थन संघातील मैदानाबाहेर बसलेल्या खेळाडूंनाही हसू आवरले नाही. मुस्तफाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Saj_PakPassion/status/1356320341732294656?s=20
https://twitter.com/KirketVideoss/status/1356464759395213313?s=20
नॉर्थन वॉरियर्सचा थरारक विजय
टीम आधी अबू धाबीने प्रथम फलंदाजी करताना ३ बळी गमावत १२३ धावा केल्या. यात ल्यूक राईट याने ३३ धावा तर ज्यो क्लार्क याने ५० धावा केल्या. धावांचा पाठलाग करत असताना नॉर्थन वॉरियर्स या संघाने अवघ्या २ बळी गमावत हा सामना आपल्या नावे केला. नॉर्थन वॉरियर्स संघाकडून फलंदाजी करताना वसिम मोहम्मद याने सर्वाधिक ७६ धावा तर लींडल सिमन्स याने ३७ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
शमी नव्हे तर जहां..! मोहम्मद शमीच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, लेकीच्या नावापुढे लावलं आपलं आडनाव
टीम इंडियाचा सरावाला प्रारंभ; प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं जोरदार स्वागत, पाहा फोटो
दे घुमा के! बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी करतेय धडाकेबाज फलंदाजी, एकदा व्हिडिओ पाहाच