---Advertisement---

शमी नव्हे तर जहां..! मोहम्मद शमीच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, लेकीच्या नावापुढे लावलं आपलं आडनाव

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 12:35 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट इतिहासात कदाचित कोणत्याही खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यातील भांडण लोकांमध्ये सर्वात जास्त पोहोचले असेल तर याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां होय. ती अनेकवेळा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ आणि फोटो शेअर करत शमीवर निशाना साधत असते. यावेळी तिने अतिशय टोकाचे पाऊल उचलले आहे.

हसीन जहां हिने आपल्या मुलीला दिले आडनाव

शमी आणि हसीन जहां यांच्या वादानंतर त्यांची मुलगी ही आईकडेच म्हणजे हसीन सोबत राहते. नुकतीच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नविन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आपल्या मुलीचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘आराह जहां’ असे लिहिले आहे. आराह हे शमीच्या मुलीचे नाव आहे. परंतु हसीन जहांने आपल्या मुलीच्या नावापुढे शमीचे आडनाव न लावता स्वत:चे आडनाव लावले आहे. अर्थात तिच्या आणि तिच्या मुलीच्या जिवनात शमीला कोणतेही स्थान नाही, असे तिला अप्रत्यक्षपणे सांगायचे आहे.

https://www.instagram.com/p/CKqwvE8giMa/?utm_source=ig_web_button_share_sheet

प्रसार माध्यमांनी उचलून धरला होता मुद्दा

मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांच्या वैयक्तिक वादाला प्रसार माध्यमांनी उधाण आणले होते. दिनांक ७ एप्रिल २०१४ रोजी त्यांचा विवाह झाला होता. काही वर्षांनंतर हसीन जहां हिने मोहम्मद शमी याच्यावर दुसऱ्या महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. यासोबतच मोहम्मद शमीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप ही केला होता. हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यामुळे सर्वांना असे वाटू लागले होते की, त्यांच्यात काडीमोड झाला आहे. परंतु असे नसून या दोघांमधील वाद न्यायालयात अजूनही सुरू आहे आणि शमीची मुलगी ही हसीन जहांसोबत राहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचा सरावाला प्रारंभ; प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं जोरदार स्वागत, पाहा फोटो

दे घुमा के! बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी करतेय धडाकेबाज फलंदाजी, एकदा व्हिडिओ पाहाच

द्रविडचा तो एक कॉल अन् रहाणेला सापडली कांगारूंना पराभूत करण्याची किल्ली 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---